
Fathers Day 2022: ‘जिसके पापा लंबे उसका भी...’अमिताभ यांच्या मुलीची खास पोस्ट
bollywood news: बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी किड्सनं सोशल मीडियावरुन फादर्स डे च्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर केल्या आहेत. त्यामध्ये (Social media viral news) बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुलीची श्वेता (amitabh bachchan) बच्चन नंदाची पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वेता नंदन यांनी आपल्या पोस्टमधून नेटकऱ्यांना बच्चन कुटूंबियाविषयी वेगळी माहिती दिली आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ (bollywood movies) बच्चन हे देखील त्यांच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हनेससाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत. काल अमिताभ यांनी डॉन या त्यांच्या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगचा फोटो शेयर केला होता.
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यातील प्रेम चाहत्यांना माहिती आहे. त्यानं देखील अनेकदा सोशल मीडियावरुन वडील बच्चन यांच्याविषयीची महती विशद केली आहे. आज फादर्स डे च्यानिमित्तानं श्वेता बच्चन नंदाच्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं पोस्टला दिलेली कॅप्शन चर्चेत आहे. नात्यानं तुम्ही माझे.. अशी कॅप्शन देऊन तिनं शहेनशहा मधील अमिताभ यांच्या चित्रपटातील एका संवादाची आठवण करुन दिली आहे. अशाप्रकारे श्वेतानं बिग बी यांना फादर्स डे च्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

shweta bachchan news
हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर
श्वेताच्या पोस्टवर अमिताभ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना श्वेताची पोस्ट आवडली आहे. वेगळ्या अंदाजात तिनं दिलेल्या शुभेच्छा त्यांना भावल्या आहेत. यासोबतच श्वेतानं बच्चन यांच्यासोबत एक सेल्फी देखील शेयर केला आहे. श्वेतानं हार्ट इमोजीसह #fathersday #girldad. देऊन फादर्स डे चा गोडवा गायला आहे. मुलीची पोस्ट पाहून अमिताभ भावूक झाले आहेत. त्यांनी लव यू मामा असे म्हणत तिच्या शुभेच्छांचा स्विकार केला आहे. नेटकऱ्यांनी देखील श्वेताच्या त्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एकानं जिसके पिता लंबे उसके का भी बडा नाम है असे म्हणून श्वेताचं कौतूक केलं आहे.
हेही वाचा: Video: या अभिनेत्याची मुलगी आहे खूप CUTE
Web Title: Bollywood Amitabh Bachchan Daughter Shweta Share Post Viral Social Media Abhishek Comment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..