'काश्मिरचा शोध मुघलांचा', अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर द काश्मिर फाईल्स चित्रपटाची जबरदस्त (The Kashmir Files) क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchanesakal

Bollywood Actors: सोशल मीडियावर द काश्मिर फाईल्स चित्रपटाची जबरदस्त (The Kashmir Files) क्रेझ असल्याचे दिसून आले आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) दिग्दर्शित या चित्रपटानं आता मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून (Social Media Viral News) घेतले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देऊन नागरिकांना काश्मिर फाईल्स पाहण्याचे आवाहनही (Amitabh Bachchan) केले आहे. यासगळ्यात बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये भारताचं नंदनवन असणाऱ्या काश्मिरविषयी वेगळचं भाष्य केलं आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बिग बी यांना ट्रोल कऱण्यात आले असून त्यावर त्यांनी ट्विट करुन आपली बाजु मांडली आहे. (Amitabh Bachchan Trolled)

अमिताभ बच्चन यांच्या बेमिसाल या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी काश्मिर हा मुघलांची शोध असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी ही क्लिप वेगळ्या प्रकारे शेयर करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, प्रोपंगडासाठी याप्रकारचे कृत्य केले जात असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून द काश्मिर फाईल्सनं वेगळ्याच प्रकारचे वातावरण निर्माण केले आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करु लागले आहेत. ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर अमिताभ यांनी व्टिटरवरुन त्याविषयी लिहिलं आहे. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली नसली तरी नेटकऱ्यांनी त्यावरुन वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे.

Amitabh Bachchan
The Kashmir Files; ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून राजकारण का होतंय ?

अमिताभ यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, आम्हाला आता खरं काही कळलं आहे. जे यापूर्वी माहिती नव्हतं. या व्टिटवरुन महानायक बच्चन यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, अमिताभ यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याराबाबत लिहिलं आहे. तर काहींनी त्याविरोधात भूमिका घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एका युझर्सनं लिहिलं आहे की, अजुनही खरं बोलण्याची हिंमत आलेली नाही का, तुमच्यासारख्या व्यक्ती आम्हाला मुर्ख बनवत असल्याची टीका त्या युझर्सनं केली आहे. सध्या व्हायरल झालेली ती क्लिप बेमिसाल चित्रपटातील असून अमिताभ त्यामध्ये म्हणतात, भारतात जेवढी थंड हवेची ठिकाणं आहेत ती इंग्रजांनी शोधली. अपवाद फक्त काश्मिरचा. ते मुघलांनी शोधलं. असं अमिताभ म्हटले आहे.

Amitabh Bachchan
Kashmir Files: 'श्रीनगरमध्ये आलात तर संपवल्याशिवाय राहणार नाही!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com