लंडनमध्येही 'सुपर 30'ची क्रेझ; केम्ब्रिजमध्ये पोस्टर्स 

super 30
super 30

पाटणा : सध्या सोशल मीडियामध्ये बिहारमधील 'सुपर-30' चे संस्थापक आनंदकुमार यांच्या बायोपिकचा ट्रेलर धुमाकूळ घालत असताना या चित्रपटाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एक मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केम्ब्रिज विद्यापीठात आनंदकुमार यांचे व्याख्यान झाले असून, त्यांनी लंडनमध्येही या चित्रपटाची उत्सुकता असल्याचे म्हटले आहे. आनंदकुमार यांना केंब्रिजमध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. केम्ब्रिज विद्यापीठाने 24 ते 28 जून दरम्यान ब्रिटन आशिया संमेलनाचे आयोजन केले होते. आनंदकुमार हा त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्याच जीवनावर बेतलेल्या नव्या चित्रपटाविषयी विचार मांडले. आनंदकुमार म्हणाले, की हा माझ्यासाठी खरोखरंच आनंदाचा क्षण असून, कधीकाळी मलाही केम्ब्रिजमध्ये शिकावे असे वाटत होते पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माझे हे स्वप्न पूर्ण झाले नाही.

हृतिक रोशन याची प्रमुख भूमिका असलेला 'सुपर-30' हा सिनेमा 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे. प्रत्यक्षात आनंदकुमार यांच्या 'सुपर-30' या संस्थेचा कारभार त्यांचे भाऊ प्रणवकुमार हे पाहतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com