लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच बॉलीवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

shewta.jpg
shewta.jpg

मुंबई : ‘मकडी’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेसा बासू प्रसाद पतीपासून विभक्त होत आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच श्वेताने घटस्फोट घेत असल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली.

बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रीने आपला घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. ट्विटरचा आधार घेत तिने आपण नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे आणि हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या वर्षी 13 डिसेंबरला पुण्यामध्ये तिचे लग्न  झाले होते. मकडी, बद्रीनाथ की दुल्हनिया सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी श्वेता बासू प्रसाद हिचे लग्न चित्रपट निर्माता रोहित मित्तल याच्याशी झाले होते. लग्नापूर्वी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

श्वेताने ट्विटरवर लिहिले आहे की, काही महिन्यांपूर्वी आम्ही या मतापर्यंत पोहोचलो होतो की आता वेगळं होणं चांगले आहे. ट्विटरवर लिहिलेल्या संदेशाच्या शेवटी श्वेताने लिहिले आहे की चांगल्या आठवणींसाठी रोहित तुझे आभार मानते, तुझ्या पुढच्या आय़ुष्यासाठी शुभेच्छा.; रोहित मित्तल यानेही हा संदेश इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याने याला नवी सुरुवात असे शीर्षक दिले आहे.

गेल्या वर्षी श्वेता आणि रोहित यांचे लग्न बंगाली आणि मारवाडी अशा संमिश्र पद्धतीने झाले होते. या दोघांची भेट अनुराग कश्यप याच्या निर्मितीगृहात झाली होती. तिथे श्वेता ही कथा सल्लागार म्हणून काम पाहात होती तर रोहित निर्माता होण्याचे अनुराग कश्यपकडून धडे गिरवत होता.

श्वेता बसू हिचे नाव 2014 च्या एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. तिच्यावर अत्यंत गलिच्छ आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर श्वेता सुटकागृहात पाठवण्यात आले होते. आणि दोन महिने तिला तिथेच रहावं लागलं होतं. या प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. आपण निर्दोष असल्याचं श्वेता सुरुवातीपासून सांगत होती. हैदराबाद सत्र न्यायालयाने तिला क्लीन चिट दिल्यानंतर तिच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला गेला. 

श्वेता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटात नुकतीच दिसली होती. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मकडी’ चित्रपटातून तिने बाल कलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. शबाना आझमी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तिने ‘चुन्नी-मुन्नी’ची दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘कहानी घर घर की’ आणि ‘करिश्मा का करिश्मा’ या टीव्ही शोमध्ये दिसली. याशिवाय श्रेयस तळपदेसोबत ‘इक्बाल’ चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.

तसेच श्वेताने मर्द को दर्द नही होता या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तिने वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेल्या बद्रीनाथ की दुल्हनियामध्येही काम केलं होतं.ती ‘शुक्राणू’ चित्रपटात अभिनेता दिव्येंद्रू शर्मा आणि शीतल ठाकूरसोबत झळकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com