तुम्ही दिवसांतून फक्त तीन वेळा... करिनानं सांगितलं डाएट प्लॅन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Bollywood Actress Kareena Kapoor) ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.
kareena kapoor diet plan
kareena kapoor diet plan

(Bollywood Actress Kareena Kapoor) ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) लग्न केल्यानंतर तिचं ग्लॅमर (Glammer) आणखी वाढलं आहे. करिना आता दोन मुलांची आई झाली आहे. मात्र तिच्या फिटनेसविषयी नेहमीच बोललं जातं. तिला फिटनेसच्या टीप्स देणाऱ्या व्यक्ती आहेत. सध्या करिनाच्या फिटनेसवरुन चर्चा सुरु आहे. तिनं तिचं डाएट प्लँनिंगविषयी बोललं जात आहे. त्यामध्ये करिनानं आपण कशाप्रकारे डाएट फॉलो करतो हे चाहत्यांना, नेटकऱ्यांना सांगितलं आहे. करिनाचा मोठा फॉलोअर्स सोशल मीडियावर (Kareena kapoor share social media diet plan) आहे.

करिनाच्या फिटनेसविषयी (Kareena Kapoor Fitness Plan) तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. वयाची चाळीशी ओलांडताना करिनानं अनेकदा त्यावर भाष्यही केलं आहे.काही दिवसांपूर्वी प्रेग्नंसीच्या दरम्यान आपल्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले होते. प्रेग्नंसी बायबल असे त्या पुस्तकाचे नाव होते. त्यावरुन तिला मोठ्या वादालाही सामोरं जावं लागलं होतं. करिना ही तिच्या डाएटसाठी ओळखली जाते. बॉलीवूडमध्ये अशा काही सेलिब्रेटी आहेत ज्या त्यांच्या फिटनेस फ्रिकसाठी ओळखल्या जातात. त्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यात करिनाचं नावंही घ्यावं लागेल.

करिनानं चाहत्यांना ती जे डाएट फॉलो करते त्याविषयी सांगितलं आहे. करिना सांगते, मी आहारतज्ञ ऋतुजा दिवेकरला फॉलो करते. तिनं मला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या मी काटोकाट पाळते. मी माझ्या दिवसाची सुरुवात पावर पॅक नाश्त्यानं करते. व्यायमापूर्वी मी साधारण 90 मिनिटे अगोदर मी भरपूर फायबर असलेलं डाएट घेते. त्याचा उपयोग माझ्या स्नायुंना होतो. व्यायमानं माझी कॅलरी बर्न होते. त्यानंतर मात्र मला अधिक ताकद मिळते.

kareena kapoor diet plan
बोनेटवर बसून स्टंटबाजी अंगलट; VIDEO व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

लंच झाल्यानंतर मी लिंबु पाणी, काळ्या मिठाचं पाणी, साखर आणि आलं यांच्या मिश्रणाचे पाणी पिते. ते मला फार लाभदायक वाटतं. रात्रीचं जेवण मी एकदम हलकं ठेवते. त्यामध्ये डाळ भात, खिचडी दही, भाजी चपाती, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असं माझ्या जेवणात असतं. अशाप्रकारचे पौष्टिक खाल्लानं मला झोपही चांगली लागते. असं करिनानं सांगितलं आहे. दिवसभरातील असं तीन वेळचं वेळापत्रक मी आवर्जुन पाळत असल्याचे करिना सांगायला विसरत नाही.

kareena kapoor diet plan
Photo Viral: कपिल शर्माच्या 'त्रिशानचा' पहिला 'बर्थ डे'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com