सरोज खानं यांनी सोडलेल्या चित्रपटानं फराह झाली ' सिकंदर'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

दिग्दर्शक म्हणून फराहचा पहिला चित्रपट मैं हू ना हा होता. त्यात प्रमुख भूमिकेत शाहरुख खान होता.  

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या कामानं वेगळी छाप सोडणा-या प्रसिध्द कोरिओग्राफर फराह खान हिचा संघर्ष मोठा आहे. आज तिच्या नावाभोवती जे काही वलय आहे त्यासाठी तिला अथक संघर्ष करावा लागला आहे. एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधील तिच्या नृत्यदिग्दर्शनानं प्रेक्षकांना समृध्द केलं आहे. फराह हे सोशल मीडियावरही कायम चर्चेत असणारं व्यक्तिमत्व आहे.

फराहनं नुकतचं 56 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं तिच्या निवडक फिल्मोग्राफीचा घेतलेला आढावा. केवळ नृत्यदिग्दर्शन नव्हे तर पुढे निर्माता आणि दिग्दर्शनापर्यत मजल मारलेल्या फराहनं आता मोठा टप्पा पार केला आहे.

1. फराहनं जो यशस्वी नृत्यदिग्दर्शिकेचा प्रवास केला आहे त्यात तिनं अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. ज्यावेळी बॉलीवूडमध्ये केवळ पुरुष नृत्यदिग्दर्शकांचा बोलबाला होता तेव्हा तिनं आपल्या कामानं वेगळी ओळख तयार केली. 

Farah Khan reveals her father died a penniless man | Bollywood – Gulf News

2.  प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना जो जीता वही सिकंदर या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव त्यांना ते जमले नाही. तेव्हा फराहला संधी मिळाली आणि तिनं या संधीचं सोनं केलं.

Farah Khan reveals how a wedding led to her own nuptials with Shirish Kunder

3. तुम्हाला सांगितल्यावर विश्वास बसणार नाही पण प्रसिध्द पॉप गायिका आणि डान्सर शकिरालाही कोरिओग्राफ करण्याची संधी फराहला मिळाली होती. 2006 मध्ये एमटीव्हीच्या वतीने न्युयॉर्क येथील रेडिओ सिटी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता.

4.  दिग्दर्शक म्हणून फराहचा पहिला चित्रपट मैं हू ना हा होता. त्यात प्रमुख भूमिकेत शाहरुख खान होता. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेअरचं सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकांचं नामांकन मिळाले होते. असे नामांकन मिळवणारी ती दुसरी दिग्दर्शिका होती.

5. एकाच व्यक्तीला अनेक टॅग असणे हे दुर्मिळ म्हणावे लागेल. यात फराहच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. ती नृत्यदिग्दर्शिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, परिक्षक, निवेदक अशा वेगवेगळ्या भूमिकेत ती दिसून आली आहे.

Farah Khan's birthday wish for Shirish Kunder is all heart | Filmfare.com

6.  केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे तर हॉलीवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा फराहनं उमटविला आहे. ब्ल्यु या चित्रपटात तिनं केलि मिनोग्युला कोरिओग्राफ केले होते. चिगी वीगी नावाचं हे गाणं होतं.

On Farah Khan Birthday Know About Her Struggling Story To Be Bollywood  Famous Director- Inext Live

7.  करण जोहरच्या कुछ कुछ होता है या चित्रपटात फराहनं अभिनयही केला होता. त्यावेळी ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती. काजलची खोड काढणारी मुलगी म्हणून तिनं एक रोल प्ले केला होता.

 8. गेल्या वर्षी फराहनं ओपन लेटर सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. त्यात तिनं वयाच्या 43 व्या वर्षी आपल्याला आई व्हावं लागल्याचे सांगितले होते. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता.

9. फराहला अन्या, कजार आणि डीवा ही तीन मुले आहेत. तिघेही आता 12 वर्षांचे आहेत.

10.  तिने वयाच्या 43 व्या वर्षी IVF च्या मदतीने आई होण्याचा निर्णय घेतला होता तिघेही आता 12 वर्षांची झाले आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood choreographer Farah khan started her career in when fate played a hand jo jita wohi sikandar