'माझ्याशी लग्न केलं असतं तर तीन जुळे असते'

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेच्या (Bollywood Actor Chunky Pandey) लग्नाचा वाढदिवस (Wedding Anniversary) आहे.
Bollywood Actor Chunky Pandey
Bollywood Actor Chunky Pandey

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेच्या (Bollywood Actor Chunky Pandey) लग्नाचा वाढदिवस (Wedding Anniversary) आहे. त्यानिमित्तानं त्याला बॉलीवूडमधल्या(Bollywood) वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता होण्याच्या इराद्यानं बॉलीवूडमध्ये आलेल्या चंकी पांडेला नेहमीच साईड हिरो (Bollywood actor chunky) म्हणून समाधान मानावं लागलं. त्याच्या बरोबरीचे कलाकार बॉलीवूडमध्ये स्टार अभिनेते झाले. मात्र त्याला दुय्यम भूमिकेवर समाधान मानावे लागले. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या चर्चेत आहे. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची चर्चा आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खाननं चंकी पांडेला वेगळ्याच प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. (Chunky Panday wedding anniversary)

फरहानं (Bollywood Director Farah Khan) दिलेल्या शुभेच्छांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आपल्या 24 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या पत्नीनं भावना पांडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये भावना आणि चंकी पांडे एका रोमँटिक मुडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तो फोटो जेव्हा चंकी पांडे आणि भावना एकमेकांना डेट करत होते तेव्हाचा आहे. यावेळी बॉलीवूडमधल्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी चंकी पांडे आणि भावना पांडेला शुभेच्छा दिल्या आहेत. यासगळ्यात फरहानं (Farah Khan) दिलेल्या शुभेच्छांची चर्चा आहे.

Bollywood Actor Chunky Pandey
'Pushpa': रश्मिका ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

फरहानं चंकी पांडे आणि त्याच्या पत्नीचा फोटो इंस्टावरुन शेय़र केला आहे. आणि त्याच्यावर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये फरहा म्हणते, चंकी तु जर माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तीन जुळी मुलं आपल्याला झाली असती. तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चंकीच्या चाहत्यांनी देखील फरहाच्या या शुभेच्छावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 1998 मध्ये चंकी पांडे आणि भावनाचं लग्न झालं होतं. दिल्लीतील एका डिस्कोमध्ये भावनाची आणि चंकीची ओळख झाली होती

Bollywood Actor Chunky Pandey
यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com