बॉलीवूडमध्ये अवतरली चॉंदनी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

"इंडिया मिस 2014' हा किताब पटकावणारी लावण्यवती हिमाचल प्रदेशची चॉंदनी शर्मा आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झालीय. तिने तिच्या करियरला मॉडेलिंगपासून सुरुवात केली. दिग्दर्शक संदेश बी. नायक यांच्या "जीनत' चित्रपटातून चॉंदनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री मल्लिका शेरावतबरोबर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चॉंदनी शर्मा सांगते की, "या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे आणि माझ्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल दिग्दर्शक संदेश नायक आणि संपूर्ण टीमची आभारी आहे; पण अभिनयाच्या या सुंदर प्रवासासाठी मी जेवढी उत्सुक आहे, तेवढीच मी नर्व्हसदेखील आहे.

"इंडिया मिस 2014' हा किताब पटकावणारी लावण्यवती हिमाचल प्रदेशची चॉंदनी शर्मा आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झालीय. तिने तिच्या करियरला मॉडेलिंगपासून सुरुवात केली. दिग्दर्शक संदेश बी. नायक यांच्या "जीनत' चित्रपटातून चॉंदनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री मल्लिका शेरावतबरोबर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चॉंदनी शर्मा सांगते की, "या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे आणि माझ्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल दिग्दर्शक संदेश नायक आणि संपूर्ण टीमची आभारी आहे; पण अभिनयाच्या या सुंदर प्रवासासाठी मी जेवढी उत्सुक आहे, तेवढीच मी नर्व्हसदेखील आहे. तरीही मला विश्‍वास आहे, की या चित्रपटातील सीनियर कलाकारांकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतील.' 

Web Title: bollywood enter chandni sharma