Ranbir Kapoor: रणबीरला पाहून विसरली भान थेट किस... व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ranbir kapoor

Ranbir Kapoor: रणबीरला पाहून विसरली भान थेट किस... व्हिडिओ व्हायरल

काही महिन्यांपूर्वी वडील झालेला अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याच्या एका चाहत्याने जबरदस्तीने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चाहत्याच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. आता रणबीर कपूरशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.

सध्या रणबीर कपूर 'तू झुठी मैं मक्कार'च्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रम आणि शोमध्ये पोहोचतोय. शनिवारी अशाच एका कार्यक्रमात तो पोहोचला, तिथे त्याला पाहून प्रचंड गर्दी झाली. यादरम्यान एका महिला चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी काढला.

पण यानंतर तिने रणबीर कपूरला किस करण्याचा आणि स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ज्यापासून अभिनेता पळताना दिसत होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्सनी चाहत्याच्या त्या कृतीवर टीका केली. एका युजरने लिहिले की, 'चाहत्याने कोणत्याही सेलिब्रिटी किंवा मुला-मुलीसोबत लिमिटमध्ये राहावे !!!

दुसर्‍या युजरने लिहिले की, 'ती हे कसे करू शकते यावर विश्वासच बसत नाहीये... ती एखाद्याच्या संमतीशिवाय आणि तो एक कौटुंबिक माणूस आहे हे माहीत असतानाही त्याला स्पर्श कसा करू शकते, हे लोक वेड्यासारखे वागतात, हे योग्य नाही.

लव रंजन दिग्दर्शित तू झुठी मैं मक्कार मार्चमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन कॅमिओ करताना दिसणार आहे.