'सेक्शन 375' चित्रपटाची 'एसआयएफएफ'मध्ये निवड...

'सेक्शन 375' चित्रपटाची 'एसआयएफएफ'मध्ये निवड...

मुंबई ः अभिनेता अक्षय खन्ना आणि रिचा चड्ढा यांचा सेक्शन 375 हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता  या चित्रपटाची शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांना ही माहिती सांगण्यात आली.

या सिनेमाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले असून हा चित्रपट सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत मीरा चोप्रा, राहुल भट आणि संध्या मृदुल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  या चित्रपटाचे कथानक रोहन खुराना नावाच्या एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याभोवती फिरतो, ज्यावर अंजली नावाच्या जूनियर वेशभूषा डिझायनरने बलात्काराचा आरोप केला आहे.  सत्र न्यायालयाने त्याला दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली असते. या चित्रपटात रिचा आणि अक्षय दोघेही वकिलांची भूमिकेत आहेत.

23 व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सेक्शन 375 दाखविला जाईल. शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'एसआयएफएफ' हा पूर्व आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. 
----
संपादन : ऋषिराज तायडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com