esakal | स्कॅम 1992 च्या दिग्दर्शकांना झाला कोरोना

बोलून बातमी शोधा

bollywood filmmaker scam 1992 hansal mehta corona positive covid 19 after family

स्कॅम 1992 च्या दिग्दर्शकांना झाला कोरोना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनाला कशाप्रकारे सामोरं जावं असा प्रश्न शासनाला पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोविड पॉझिटिव्ह असणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे बेड, ऑक्सिजनची कमी आहे, दुसरीकडे रेमडेसिव्हरचा तु़टवडा जाणवतो आहे. बॉलीवूडमध्ये देखील कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आता स्कॅम 1992 चे दिग्दर्शक हंसल मेहता यांना कोरोना झाला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. हंसल मेहता यांनी आपल्या मुलाकरिता रेमडेसिव्हरची मागणी केली होती. सर्वसामान्य व्यक्तींपासून सेलिब्रेटींनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर सध्याच्या घडीला प्रभावी औषध असणारे रेमडेसिव्हर औषधही उपलब्ध होत नसल्यानं सर्वसामान्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आता हंसल मेहता यांचे संपूर्ण कुटूंब कोरोनाग्रस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे.

राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी लाखांच्या घरात आहे. हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, माझ्या परिवाराला कोरोनाची बाधा झाली आहे. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरंनटाईन आहोत. मेहता यांनी आपल्या व्टिटमध्ये असे म्हटले आहे की, आता असे वाटत आहे की, मला कोरोना झाला आहे. घसा प्रचंड दुखत आहे. ताप असल्यानं अशक्तपणाही जाणवत आहे. अजूनही रिपोर्ट येण्याची वाट पाहतोय.

यापूर्वी मेहता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, माझा मुलगा पल्लव मेहता याला कोरोना झाला आहे. मी त्याच्यासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती सोशल मीडियावर केली होती.