सलमान आणि करण जोहर चित्रपटनिर्मितीत एकत्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई : बॉलिवूडमधील स्टार मंडळींच्या जशी स्वतःची वेगवेगळी शैली असते तशीच प्रत्येकाची वागण्याची वेगळी तऱ्हा असते. त्यामुळे दोन स्टार मनापासून कधी एकत्र आल्याचे अलीकडे तरी दिसत नाही. मात्र, 2017 मध्ये बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानने ही परंपरा मोडीत काढायचं ठरवलंय. सलमानने बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत एकत्रितपणे एका चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं आहे. 

एवढंच नव्हे, तर सलमान आणि करणच्या या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नववर्षाच्या आरंभी करण जोहरने ही बातमी दिली आहे. या वर्षात हा चित्रपट बनणार असला तरी तो प्रदर्शित होण्यासाठी 2018 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

"सलमानसोबत चित्रपटनिर्मिती करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे..." असे ट्विट करून करण जोहरने याबाबत माहिती दिली आहे. अनुराग सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 
"जेव्हा एखादा खास चित्रपट तयार करण्यासाठी असे मित्र एकत्र येतात तेव्हा खरोखर बंधुत्वाची भावना येते," असे करणने म्हटले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood has salman, karan johar coproducing a film with Akshay kumar