बोल्ड सीन देताना आता घाबरणार नाहीत अभिनेत्री.. कारण आता शूटिंगच्या सेटवर असणार..Bollywood Intimate Scene | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Intimate Scene

Bollywood Intimate Scene: बोल्ड सीन देताना आता घाबरणार नाहीत अभिनेत्री.. कारण आता शूटिंगच्या सेटवर असणार..

Bollywood Intimate Scene: आतापर्यंत कितीतरी बॉलीवूड अभिनेत्रींनी आपल्या मुलाखतींमधून खुलासा केला आहे की इंटिमेट सीन किंवा किंसिंग सीन्स करण्यादरम्यान त्या मेंटल ट्रॉमामधून गेल्या होत्या. एकीकडे जिथे सेटवर केवळ पुरुषप्रधान संस्कृतीचं वातावरण असल्याकारणानं अभिनेत्रींना बोल्ड सीन्स देण्यात कम्फर्ट फिलिंग नसायचं तिथे दुसरीकडे पुरुष सह-कलाकार याचा फायदा घेत मर्यादा ओलांडायचे.

कितीतरी अभिनेत्री तर याच कारणानं असे बोल्ड सीन्स करताना भयानक टेन्शन घ्यायच्या. गेल्या काही दिवसांपासून हॉलीवूडसारखं भारतातही इंटीमसी को-ऑर्डिनेटर या ट्रेन्डनं जोर पकडला आहे. दोन कलाकारां दरम्यान गार्डचं काम करतात हे इंटीमेट को-ऑर्डिनेटर आणि दोघांनाही वाटणारी असहजता कमी करतात. (Bollywood Intimate Scene making process change actress tension free)

असं असलं तरी आता देखील बॉलीवूड इंडस्ट्रीतील कितीतरी लोकांसाठी इंटिमेट को-ऑर्डिनेटर हा शब्द नवीन आहे. इंटिमेट को-ऑर्डिनेटर हा शब्द दीपिका पदूकोणच्या 'गहराइयां' सिनेमा दरम्यान चर्चेत आला होता.

सिनेमात दीपिकाच्या बोल्ड सीन्सच्या मागे याच टेक्निकल लोकांचा हात होता. हळू हळू आता इतरही सेटवर या इंटिमेट को-ऑर्डिनेटरना शूटसाठी बोलावलं जाऊ लागलं. चला जाणून घेऊया की हे इंटीमेसी को-ऑर्डिनेटर नेमकं काय आणि कसं काम करतात.

Bollywood Intimate Scene

Bollywood Intimate Scene

इंटिमेट को-ऑर्डिनेटर हे टीमचाच हिस्सा असतात, जे कलाकार,दिग्दर्शक आणि निर्मात्यां दरम्यान योग्य संवाद साधत गोष्टी क्लिअर करतात. ते सिनेमातील इंटिमेट किंवा सेन्सिटिव्ह सीन एका विशिष्ट पद्धतीनं,नियम-कायद्यात राहून शूट करण्यासाठी गाईड करतात.

यामध्ये कलाकारांची बोल्ड सीन करतानाची परवानगी डोक्यात ठेवली जाते. कोणाताही बोल्ड सीन करताना अभिनेत्याची कम्फर्ट लेवल आणि परवानगी सगळ्यात महत्त्वाची असते यामध्ये.

भारतात सगळ्यात आधी 'मस्तराम' नावाचा एक शो आला होता ज्यासाठी एका इंटीमसी को-ऑर्डिनेटरला कॅनडाहून बोलावलं होतं. असं पहिल्यांदा घडत होतं,जेव्हा कोणत्या प्रॉडक्शन हाऊसनं इंटीमसी को-ऑर्डिनेटरला बोलावलं होतं. पण बॉलीवूडमध्ये हा ट्रेंड सुरू झाला तो 'गहराइयां' सिनेमामुळे.