
Kangana Ranaut: 'अगं तू फॉलोवर्स विकत घे', फुकटचा सल्ला दिला अन् कंगनानं तिचे कान टोचले
मनोरंजन विश्वातील चर्चेतलं नाव म्हणजे कंगना रणौत. ती नेहमी असं काही तरी करते की ती चर्चेत येतेच. राजकारण असो किंवा मनोरजंन विश्व कंगना ही नेहमीच अनेक विषयावर तिचं परखड मत व्यक्त करत असते. ती तिच्या पोस्ट आणि ट्विटवरुन अनेकांवर निशाणा साधत असते. त्यामुळे तिच्यावर टिकाही होत असते.
आता कंगणा चर्चेत आली ती तिच्या नव्या ट्विटमुळे. नुकतच तिला तिच्या एका चाहत्याने फॉलोअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला. ज्याला उत्तर देतांना कंगनेही पोस्ट शेअर केली.
कंगनाला तिच्या चाहत्याने फॉलोअर्स विकत घेण्याचा सल्ला दिला आणि ट्विटरवर तिच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, 'कंगना तू एक टॉप अभिनेत्री आहेस तू सुद्धा इतर अभिनेत्रींप्रमाणे फेक फॉलोअर्स विकत घे'.
याला उत्तर देताना कंगना म्हणाली की, नाही नाही, मी माझ्या चाहत्यांशी साधलेला संवाद इतरांनी पहावा असं मला वाटत नाही. ते योग्य आहेत तेच ठिक कमी असतील तरी चालेल. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे, कोणतीही मौल्यवान गोष्ट मागितल्याशिवाय देवु नये... अशा कामांचे वाईट परिणाम होतात.'
मग काय कंगणाचं हे उत्तर वाचल्यानंतर तिचे चाहते खुपच खुश झाले आणि तिचं कौतुक करु लागले. एका चाहत्यांने लिहिलं की, योग्यच आणि खोट्या फॉलोवर्सची काय गरज आहे. ती बाहेरून आणि आतूनही खरीखुरी व्यक्तिमत्त्व आणि खूप गोड आहे." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "हेच तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. म्हणूनच आम्ही तूझं कौतुक करतो."
कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा हा पुढचा भाग असेल. कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.