Karan Johar: करणच्या मुलांनी तयार केलं डिस्को दीवानेचं थर्ड व्हर्जन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar

Karan Johar: करणच्या मुलांनी तयार केलं डिस्को दीवानेचं थर्ड व्हर्जन?

करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहे. तो नेहमीच बॉलिवूडमधील स्टार किड्सला त्याच्या चित्रपटात लॉंन्च करत असतो. त्यामूळे त्याला नेपोटिझम सारख्या आरोपांचां सामनाही करावा लागतो. त्याने स्टुडंट ऑफ द इयर मध्येही तीन स्टार किड्सला संधी दिली. तो चित्रपटही चांगलाच हिट झाला. त्यातील "डिस्को दीवाने" हे गाणं अजूनही लोकप्रिय आहे.

हेही वाचा: Karan Johar: करणचा ट्विटरला रामराम, नेटकरी म्हणे, 'आता तुझा शो बंद कर'!

हे गाणं पहिल्यांदा 1981 मध्ये नाझिया हसनच्या चित्रपटात वापरले गेलं आणि नंतर करण जोहरने त्याच्या दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द इयरसाठी या गाण्याचं रीमिक्स केले. आता नुकतच त्याने या गाण्याच्या तिसऱ्या व्हर्जनची झलक दिली.

 खरं तर त्याने हे गाणं लॉन्च वैगरे केलेलं नाही तर त्याची मुलं यश आणि रुही यांनी हे गाणं गायलं आहे आणि त्याच्या हूक स्टेप्सही केल्या आहेत. त्यांच्या स्वत: च्या बोबड्या आवाजात मुलांनी गायलेलं हे गाणं सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

करणने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याचा मुलगा यशने हातात लहान डिस्को बॉल्स पकडलेला आहे. तु काय गातोय असं विचारतो आणि यश गाणं गायला सुरवात करतो. लगेच त्याची बहीण रुहीपण त्याच्यासोबत गाते. त्यानंतर करण म्हणतो हे या गाण्याचं 2.O व्हर्जन आहे.व्हिडिओ शेअर करताना, करण जोहरने संगीतकार विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनाही टॅग केलंयं, ज्यांनी SOTY साठी गाणे रीमिक्स केले होतं. “ही #discodeewane ची तिसरं व्हर्जन आहे! कृपया @vishaldadlani आणि @shekharravjiani यांची नोंद घ्या!” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा: Karan johar video: ‘तू एवढा खराब का गातो’? करणच्या मुलांनीच घेतली त्याची शाळा!

याव्हिडिओवर नीतू कपूरने, नेहा धुपिया, मनीष मल्होत्रा ​​आणि प्रीती झिंटाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचं बरोबर दिया मिर्झाने, सोफी चौधरी, मिनी मल्होत्रा ​यांनीही त्याचं कौतूक केलं आहे. करण नेहमीच त्याच्या मुलांचे असे मजेदार व्हिडिओ त्याच्या चाहत्यासोबत शेअर करत असतो.