esakal | कोण आहे 'शहजादा'?; 'दूनिया का सबसे गरीब प्रिन्स'
sakal

बोलून बातमी शोधा

 कोण आहे 'शहजादा'?; 'दूनिया का सबसे गरीब प्रिन्स'

कोण आहे 'शहजादा'?; 'दूनिया का सबसे गरीब प्रिन्स'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचं नाव घ्यावं लागेल. त्यानं कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये मोठी कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचे कारण त्यानं प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या विरोधात वक्तव्य करुन बसला. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली. त्याच्या काही प्रोजेक्टमधून त्याला बाहेरचा रस्ता करण जोहरनं दाखवला. त्याची चर्चाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली होती. याचा परिणाम कार्तीकच्या आगामी प्रोजेक्टवरही झाला. मात्र आता त्याला काही प्रोजेक्ट मिळाले आहे.

कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या टाइटल्सची अशातऱ्हेने घोषणा करत आहे जशी पुस्तकाची पाने पलटत असावा. रोहित धवन यांच्याद्वारे दिग्दर्शित त्याचा आगामी चित्रपट 'शहजादा'ची घोषणा हा या वर्षीचा त्याच्या तिसरा चित्रपट आहे, ज्यावर तो काम करतो आहे. या चित्रपटात तो आपली 'लुका छुपी'ची सह-कलाकार कृति सेननसोबत दिसणार असून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकायला सज्ज आहे. ज्याने ओरिजनल चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलु'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. 2020मधली सर्वात मोठ्या हिट चित्रपटाला हिंदी दर्शकांसाठी पुन्हा बनवण्यात येत आहे. कार्तिकने या आधी अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमुलु'मधील गाणे 'बुट्टा बोम्मा'वर एक डांस व्हिडीओ शेअर केला होता आणि आता, 'शहजादा'च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.

चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टॅेग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रीमेक दमदार होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून 4 नोव्हेंबर, 2022 पडद्यावर येईल. कार्तिक आर्यनकडे महत्त्वाच्या चित्रपटांची रांग असून चित्रपटांच्या बॅक टू बॅक घोषणांमुळे ही यादी वाढतच चालली आहे. सध्या त्याच्याकडे 'धमाका', 'भूल भुलैया 2', 'फ्रेडी' आणि 'शहजादा' आदी चित्रपट आहेत.

हेही वाचा: VIDEO : कार्तिक आर्यन हरवला जंगलात अन् पोलिसांनी काढली 'सेल्फी'

हेही वाचा: कार्तिक आर्यन म्हणतोय, 'आज खुश तो बहुत होगे तुम' !

loading image
go to top