
वीस कोटी देते, माझ्याशी लग्न कर! कार्तिकला काय बोलावं कळेना
Bollywood News: बॉलीवूडमध्ये कमी काळात मोठी लोकप्रियता मिळवणारा (Bollywood Actor) अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनची ओेळख आहे. त्यानं आतापर्यत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांतून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. (Bollywood Movies) आता तो त्याच्यावर सोशल मीडियावर मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे. कार्तिकला एका चाहतीनं प्रपोझ केलं आहे. त्यामुळे कार्तिकला(Kartik Aryan) तिला काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडला होता. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरमुळे (Karan Johar) कार्तिकला एक सिनेमा गमवावा लागला होता.
कार्तिक आर्यनच्या त्या पोस्टवर एका मुलीनं कमेंट करताना मी तुला वीस कोटी रुपये देते असे म्हटले होते. कार्तिक आर्यन हा सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे असे म्हटले जाते. त्यांचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. तो काही फारसा चालला नाही. आता सोशल मीडियावर कार्तिक आर्यन हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन हा करण जोहरसोबत घेतलेल्या पंग्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. विनोदी कलाकार म्हणून कार्तिक आर्यन हा जरी लोकप्रिय अभिनेता असला तरी, अद्याप त्याच्या नावावर स्वतंत्र हिट चित्रपटाटी नोंद नाही.
हेही वाचा: Jhund: 'सर,रडून दाखवा'; सेटवर एका मुलानं अमिताभना केली होती विनंती
कार्तिकच्या त्या पोस्टला आतापर्यत हजारो कमेंटस् आल्या आहेत. त्यापैकी काही कमेंट्स या तर भलत्याच गंमतीशीर आहे. आता कित्येकांनी कार्तिकसाठी बोली लावायला सुरुवात केली आहे. एका चाहतीनं लिहिलं आहे की, कार्तिक प्लिज माझ्याशी लग्न कर. मी तुला वीस कोटी रुपये देते. यावर कार्तिकनं देखील चाहत्यांना बोली लावण्यासाठी आवाहन केलं आहे. कार्तिकच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा साधारण दोन महिन्यांपूर्वी त्याचा धमाका नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो काही फारसा प्रेक्षकांना प्रभावित करु शकलेला नाही.
Web Title: Bollywood Kartik Aryan Fan Proposed Marry Her Gave 20 Core
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..