Krk vs Slaman: केआरकेने जोडले सलमानपुढे हात म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krk vs Slaman

Krk vs Slaman: केआरकेने जोडले सलमानपुढे हात म्हणाला...

बॉलिवूडमध्ये असे अनेक महारथी आहेत जे त्याच्या कामामुळे कमी आणि विवादित वक्तव्यामूळे जास्त चर्चेत असतात. त्यातच कमाल रशीद खान म्हणजेच केआरके यांच्या नावाचाही सामावेश होतो. तो अनेकदा बऱ्याच कारणाने वादात सापडतात.त्याच्या ट्विटमुळेही चर्चेत असतो.

हेही वाचा: Bollywood: ...म्हणून पाकिस्तानी अभिनेत्याने नाकारले होते बॉलिवूडचे चित्रपट

आपल्या ट्विटमध्ये तो करण जोहरपासून सलमान खानपर्यंत अनेक बड्या स्टार्सवर निशाणा साधत असतो. कोणत्या न् कोणत्या कारणाने त्याच्यावर टिका करत असतो. आता पुन्हा एकदा कमाल आर खानचे एक ट्विट चर्चेत आहे. मात्र, यावेळी त्यांने कुणाला टार्गेट केलेलं नाही तर  सॉरी म्हटलं आहे.

हेही वाचा: KRK Tweet: 'तुमच्या चित्रपटापेक्षा रिल्स चांगले' रितेश जेनेलियावर निशाणा

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये भाइजान म्हणजेच सलमान खानला सॉरी म्हटले आहे. केआरकेला यापूर्वी अटक करण्यात आली होती आणि त्याच्या अटकेमागे बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान असल्याचा आरोप त्याने केला. त्याच्या अटकेमागे कुणी नसून सलमान असल्याचा दावा केला, मात्र  आता तो म्हणतो की त्याच्या अटकेमागे सलमान नव्हे तर कोणा दुसऱ्याचा हात होता, पण सलमान खान नाही तर कोण याचा खुलासा त्यांने केलेला नाही. आणखी एका ट्विटमध्ये त्याने म्हटलंय की, अनेकांना वाटते की त्याच्या अटकेमागे करण जोहरचा हात होता, पण हे देखील चुकीचे आहे.

हेही वाचा: Salman Khan: सलमान खानचं गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या

 केआरकेच्या या ट्विटवर यूजर्सनी मात्र त्याची चांगलीच खिल्ली उडवली. त्याच बरोबर मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सप्टेंबरमध्ये केआरके दुबईहून मुंबईला परतला, त्यावेळी पोलिसांनी त्याला विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं. केआरकेवर आधीच दोन खटले सुरू होते. त्यामुळे त्याला विमानतळावरून थेट तुरुंगात नेण्यात आले. एका अभिनेत्रीने कमलवर गंभीर आरोप केल्याचंही बोलंल जात होतं.