बिष्णोई गँगच्या लिस्टमध्ये होता करण जोहर, हल्ल्याचं कारण आलं समोर

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
Karan johar news
Karan johar news esakal

Salman Khan Threat Case : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. बिष्णोई गँगच्या (Bishnoi Gang) वतीनं त्यांना ही धमकी देण्यात आली होती. सलमानच्या वडीलांना धमकीचे ते निनावी पत्र मिळाले होते. त्यानंतर त्यांनी तातडीनं (Salman Khan) पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घराबाहेर कडेकोट पहारा उभा केला आहे. सलमानकडे देखील या (Mumbai Police) प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यानं आपल्याला ज्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आली त्याला आपण ओळखत नसल्याचे सांगितले होते.

सलमानला धमकी आल्यानंतर आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि (Karan Johar) दिग्दर्शक करण जोहरचे नाव समोर आले आहे. बिष्णोई गँग्जच्या वतीनं फक्त (Salman Khan Threat Case News) सलमानलाच नाही तर करण जोहरला देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर करणवर हल्ला करण्यासंबंधीचे सर्व प्लँनिंग देखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवालाची हत्या झाल्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्या घटनेचा आणि बिष्णोई गँग्जचा संबंध जोडण्यात आला होता.

सलमान आणि त्याच्या वडिलांना धमकी मिळाल्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केल्यानंतर त्या तपासातून करण जोहरशी संबंधित मोठी बातमी हाती आली आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या सौरव कांबळे उर्फ महाकाळकडून अशी माहिती मिळाली आहे की, बिष्णोई गँग्जच्या निशाण्यावर केवळ सलमानच नाहीतर करण जोहर देखील होता. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.

Karan johar news
Salman khan Threat: मुंबई पोलिसांकडून 200 CCTV जप्त, 10 पथकांकडून वेगानं तपास

महाकाळनं पोलिसांना जी माहिती दिली त्यामध्ये त्यानं असं म्हटलं आहे की, प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंगनं आत्महत्या केली त्याला जबाबदार करण जोहर होता. तेव्हापासून तो बिष्णोई गँग्जच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळेच करण जोहरला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी घेण्याचे प्लँनिंग केल्याचे महाकाळ यानं सांगितलं आहे.

Karan johar news
Sidhu Moose Wala Murder : कंगना भडकली, पंजाब सरकारवर साधला निशाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com