Rocketry : आर माधवनच्या चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखनं मानधन नाकारलं

जगप्रसिद्ध कान्स या चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अभिनेता आर माधनवच्या रॉकेट्री द नांबी इफेक्ट या चित्रपटाचे स्क्रिनिंग (Cannes 2022) झाले.
Rocketry The Nambi Effect News
Rocketry The Nambi Effect News esakal

Rocketry The Nambi Effect Movie: जगप्रसिद्ध कान्स या चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अभिनेता आर माधनवच्या रॉकेट्री द नांबी इफेक्ट या चित्रपटाचे स्क्रिनिंग (Cannes 2022) झाले. त्याला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला. आता हा चित्रपट भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून आर माधनवच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल होते. त्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं एकही रुपयाचे मानधन न घेता भूमिका केली आहे. एकीकडे विक्रम या कमल हासन यांच्या चित्रपटामध्ये सुर्यानं विनामानधन काम केल्याची चर्चा होत असताना शाहरुखनं देखील त्याच प्रकारे भूमिका केल्यानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

आर माधवनचा रॉकेट्री हा त्याचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट होता. गेल्या काही (Entertainment News) वर्षांपासून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. हा चित्रपट तयार करताना त्याला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला होता. वेगवेगळ्या मुलाखतींमधून त्यानं याविषयी सांगितलेही होते. 1 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात शाहरुखशिवाय टॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता सुर्याही दिसणार आहे. सध्या आर माधवन आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. एका प्रेस कॉ़न्फरन्समध्ये त्यानं शाहरुखनं रॉकेट्रीसाठी कशाप्रकारे सहकार्य केलं याविषयी सांगितलं आहे.

शाहरुख जेव्हा त्याच्या झीरो चित्रपटाची शुटींग करत होता तेव्हा माधवननं त्याला आपल्या या चित्रपटासाठी विचारणा केली होती. शाहरुखनं देखील त्यात सहभागी होण्यास संमती दर्शवली होती. चित्रपटाचा विषय यामुळे शाहरुखनं एकही रुपया मानधन न घेता त्यामध्ये भूमिका केल्याचे माधवननं म्हटले आहे. रॉकेट्री हा चित्रपट इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि रॉकेट सायंटिस्ट म्हणून नांबी नारायणन (Nambi Narayanan) यांच्यावर आधारित आहे. ' (Rocketry: The Nambi Effect)

नांबियार यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला होता. त्यांनी कशाप्रकारे संघर्ष करुन आपल्यावरील हा आरोप खोटा ठरवला याविषयी चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. त्यात मुख्य भूमिका आर माधवननं साकारली आहे. माधवननं एएनआयशी बोलताना सांगितले की, शाहरुखनं आपल्याला या चित्रपटासंबंधी विचारणा केली होती. त्याचा भाग व्हायला मला आवडेल असेही तो म्हणाला होता.

Rocketry The Nambi Effect News
Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली

शाहरुख मला म्हणाला होता की, या चित्रपटामध्ये मला कोणत्याही प्रकारचा रोल चालेल. तो असा म्हणाल्यानंतर मला उत्साह वाटला. मला सुरुवातीला असं वाटलं की, शाहरुख आपली गंमतच करतो आहे. मात्र त्यानं ते गंभीरपणे केलेलं विधान होतं. चित्रपटाविषयी शाहरुखनं आणखी काही विचारणा केल्यानंतर तो त्यात काम करायला तयार झाला. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतलेले नाही. असंही माधवन यानं यावेळी सांगितले.

Rocketry The Nambi Effect News
Movie Review: 'फनरल'- 'आनंदी जीवनाचा जगण्याचा नवा मंत्र' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com