अरिजीतचं 'तुमसे भी ज्यादा' व्हायरल; आता प्रतिक्षा 'तडप'ची

मनोरंजन विश्वामध्ये आता मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत.
अरिजीतचं 'तुमसे भी ज्यादा' व्हायरल; आता प्रतिक्षा 'तडप'ची

मनोरंजन विश्वामध्ये आता मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले प्रोजेक्ट सुरु झाले आहेत. काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. तर काही येत्या आठवडाभरात प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे तडप. अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. अहान त्याच्या पहिल्या चित्रपटात तारा सुतारियासोबत दिसणार आहे आणि चित्रपटाच्या रॉ आणि इंटेन्स ट्रेलरने प्रत्येकाला कथेशी जोडले आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे ज्याला रसिकांची खूप पसंती मिळत आहे.

'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' आज धनत्रयोदशीला रिलीज झाले असून अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली असून क्लिपमध्ये तो आणि तारा चुंबन घेताना आणि रोमांचक क्षण एकत्र घालवताना दिसतात मात्र, पुढच्याच क्षणी कोणीतरी त्यांना ओढून एकमेकांपासून दूर करतात. त्याची बाईक देखील पेटवली जाते. एकूणच या गाण्याने चाहत्यांना चित्रपटांविषयी अतिशय उत्सुक केले आहे. त्यांना हे गाणं अतिशय आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसून आले आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित, नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अरिजीतचं 'तुमसे भी ज्यादा' व्हायरल; आता प्रतिक्षा 'तडप'ची
अहानचा शर्टलेस डॅशिंग लूक, ताराची ब्युटी; 'तडप' Trailer Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com