बॉलीवूडचा "रॅम्बो' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

हॉलीवूड ऍक्‍शन स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनच्या "रॅम्बो' चित्रपटाने एके काळी तरुणाईला वेड लावलं होतं. त्यातील ऍक्‍शनने त्यांना थक्क करून सोडलं होतं.

हॉलीवूड ऍक्‍शन स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनच्या "रॅम्बो' चित्रपटाने एके काळी तरुणाईला वेड लावलं होतं. त्यातील ऍक्‍शनने त्यांना थक्क करून सोडलं होतं. "रॅम्बो'चे अनेक भाग येऊन गेले. आता बॉलीवूडमध्ये त्याचा रिमेक बनतोय.

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो टायगर श्रॉफ प्रेक्षकांना रॅम्बोच्या भूमिकेत दिसणार आहे. अगदी हुबेहूब स्टेलॉनसारखा त्याचा लूक असेल. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टायगरने शनिवारी भारतीय "रॅम्बो'च्या पोस्टरचं अनावरण केलं. "हिरोपंती' अन्‌ "बागी' चित्रपटांतून टायगरने आपण ऍक्‍शन हिरो असल्याचं सिद्ध केलं. आता "रॅम्बो'चं चॅलेंज त्याने स्वीकारलंय. हृतिक रोशनच्या "बॅंग बॅंग' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. दलजीत डीजे परमार, समीर गुप्ता, हंट लॉरी, सिद्धार्थ आनंद, सौरभ गुप्ता आणि गुलजार इंदर चाहल त्याचे निर्माते आहेत.

भारताच्या पार्श्‍वभूमीवर चित्रपट बनवला जाणार आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाले, "रॅम्बो' माझ्या काळचा ऍक्‍शन हिरो होता. स्टेलॉनचे चित्रपट पाहत मी मोठा झालो. बॉलीवूडच्या ऍक्‍शन फिल्ममध्ये काही तरी नवीन करण्याची इच्छा होती. "रॅम्बो'सारख्या एका ऍक्‍शन हिरोची गरज होती. तो मला टायगरमध्ये दिसला. त्याच्याबरोबर काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. टायगर मार्शल आर्ट चॅम्पियन असलेला अभिनेता असल्याने मी त्याची निवड केली. 
 

Web Title: Bollywood RAMBO Remake Signs Tiger Shroff's Perm In Lead Role