Swasthyam 2022 : नातं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा....रितेशनं जेनेलियासोबतच्या नात्यावर सांगितली मोठी गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish-Genelia
Swasthyam 2022

Swasthyam 2022: नातं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा....रितेशनं जेनेलियासोबतच्या नात्यावर सांगितली मोठी गोष्ट

‘सकाळ स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत.या निमीत्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी व्हेगन जीवनशैलीचा प्रवास याबद्दल मार्गदर्शन केले.त्याचबरोबर नातं कसं जोडायचं आणि टिकवायचं याबद्दल रितेशने काही सल्लेही दिले आहेत.

हसणे हे सर्वात चांगला उपचार कसा आहे याबद्दलच स्वास्थ्यममध्ये रितेश आणि जेनेलिया यांनी खास गप्पा मारल्या. हसणे हे आपल्याला आनंद देते. आणि हेच हसणे औषध सुद्धा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातच जेनेलियाने सांगितलं की ६ वर्षांपूर्वी आम्ही शाकाहारी होतो आणि ४ वर्षांपूर्वी व्हेगन झालो आहोत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

त्यानंतर नात कसं यशस्वी करावं याबद्दलही सांगितलं. रितेश म्हणाला की, "आपण नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या माणसाची गरज मोठी होते तेव्हा नातं अयशस्वी होतं" दोघांच्या नात्याबद्दल बोलतांना रितेश म्हणाला की, "५००० रुपयांच्या वरच गिफ्ट असेल तर जेनेलियानी नियम केला आहे की मग वर्षभर गिफ्ट द्यायचं नाही. तिचं म्हणनं असंत की गिफ्ट देऊ नका वेळ द्या." म्हणजेच नात्यात मोठ मोठ्या गिफ्ट किंवा देखाव्याची गरज नसते केवळ एकमेंकाना वेळ दिला की नातं आपोआप जपलं जातं. पुढे बोलतांना तो म्हणाला की कितीही मोठी चूक असली तरी माफ करायला शिका. यामूळे नातं मजबूत होतं.

हेही वाचा: Swasthyam 2022 : मनाला शांती अन् शरीराला ऊर्जा

रितेश आणि जेनेलिया हे त्याच्या वेड या चित्रपटामूळेही चर्चेत आहे. याबद्दल बोलतांना केवळ रितेश म्हणाल्यामुळे मी १० वर्षांनी सिनेमा करण्यास तयार झाल्याचं जेनेलिया सांगितलं. यावेळी त्यांनी त्याच्या 'वेड' या चित्रपटाच प्रमोशनही केलं