'पीएम मोदी यांनी सांत्वन केल्यामुळे..',Satish Kaushik यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Wife

'पीएम मोदी यांनी सांत्वन केल्यामुळे..',Satish Kaushik यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल

बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 66 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी आहे. बॉलिवुडवरही शोककळा पसरली आहे.

सतिश यांचे जाणे हे अजूनही अनेकांना मान्य नाही. त्याचं अचानक असं सोडून जाणं हे त्याच्या कुटुंबासाठी धक्काच आहे.त्याचबरोबर त्यांचा मित्र आणि चाहता परिवारही खुप मोठा होता. सतीश कौशिक यांच्या निधनाने प्रत्येकजण दु:खी झाला आहे अभिनेता अनुपम खेर देखील आपल्या सर्वात खास मित्राला निरोप देण्याचे दु:ख अजुनही विसरू शकत नाही.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांची पत्नी शशी कौशिक यांना शोक पत्र पाठवले होते. ज्या पत्रास त्यांनी उत्तर दिले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे .

सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांचे उत्तर शेअर करताना अनुपम खेर यांनी पंतप्रधानांनी पाठवलेले पत्रही शेअर केले आहे. सतीश कौशिक यांच्या पत्नी या ट्विटमध्ये लिहितात की, पंतप्रधानांच्या भावनिक पत्राने आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी या दु:खाच्या क्षणी मलमासारखे काम केले आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनावर सांत्वन करतात तेव्हा ते दुःखाला सामोरे जाण्याचे बळ देते. शशी यांनी आपली मुलगी आणि संपूर्ण कुटुंबाच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तर दुसरीकडे, सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पीएम मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केले होते. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले आहे, असं पंतप्रधानांनी लिहिले होते. त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत अशा शब्दात त्यांनी सतिश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली होती.

ही पोस्ट अभिनेते अनुपम खेर यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर केली. अनुपम खेर आणि सतिश कौशिक यांची मैत्री ४५ वर्ष जुनी आहे. सतिश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांच्यासाठी त्यांचे निधन म्हणजे मोठा धक्का आहे.

पोस्टमार्टममध्ये सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र दिल्ली पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. सतीश कौशिक यांनी दिल्लीतील त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर पार्टीला हजेरी लावली होती. त्यानंतर सतिश यांच्या मित्राच्या पत्नीने सतिश यांचा खुन करण्यात आल्याचा आरोप तिच्या पतीवर केला होता. मात्र सतिश यांची पत्नी शशी कौशिक यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.