बॉलीवूड गिरवणार सिक्‍वेलचा कित्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

"एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, रा-वन‘ आदींबरोबरच सहा-सात चित्रपटांचा येणार दुसरा भाग

मुंबई - एखादा चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा सिक्वेल काढण्याचा फंडा बॉलीवूडमध्ये नवा राहिलेला नाही. आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल आलेले आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वीही ठरलेत. पहिल्या भागाच्या पुण्याईवर सिक्वेलची पोळी भाजून घेण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असतो. आताही "एक था टायगर‘, "जॉली एलएलबी‘, "मर्दानी‘, रा-वन‘ आदी तब्बल सहा ते सात चित्रपटांचे सिक्‍वेल बॉलीवूडमध्ये पाहायला मिळणार आहेत. एकूणच बॉलीवूड सिक्‍वेलचा कित्ता गिरवण्यास सज्ज झाले आहे.

सलमान खान आणि कतरीना कैफ यांच्या "एक था टायगर‘ने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. आता त्याचा दुसरा भाग ‘टायगर जिंदा है‘ नावाने येत आहे. "एक था टायगर‘चे दिग्दर्शन कबीर खानने केले होते; परंतु त्याचा दुसरा भाग "सुलतान‘फेम दिग्दर्शक अली अब्बास जाफर दिग्दर्शित करणार आहे. प्रसिद्ध निर्माता आदित्य चोप्रा त्याची स्क्रिप्ट लिहिणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि यशस्वी ठरलेल्या "रुस्तम‘नंतर अक्षय कुमार "जॉली एलएलबी-2‘मधून आपल्या भेटीला येणार आहे. अर्शद वारसीच्या "जॉली एलएलबी‘ने 37 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याची कथा 1999 च्या संजीव नंदाच्या हिट ऍण्ड रन केसपासून प्रेरित झालेली होती. "जॉली एलएलबी‘च्या दुसऱ्या भागात अक्षय आणि हुमा कुरेशी झळकणार आहेत. त्याचे चित्रीकरण जोरात सुरू आहे. 2017 मध्ये तो रिलीज होईल.

अनेक दिवस पडद्यापासून दूर राहिलेल्या राणी मुखर्जीने "मर्दानी‘ चित्रपटातून पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत धमाकेदार कमबॅक केले होते. ह्युमन ट्रॅफिकिंगविरोधात लढणारी शिवानी शिवाजी रॉय राणीने मस्त साकारली होती. आता "मर्दानी‘चाही सिक्‍वेल येत असून, राणीच त्यात नायिकेच्या भूमिकेत आहे. चित्रपट कधी येणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. दिवाळीच्या झगमगाटात रिलीज झालेल्या शाहरूख खानच्या "रा-वन‘ने चांगली कमाई केली होती. आता शाहरूख त्याचा दुसरा भाग आणण्याचा विचार करीत आहे. "रईस‘ चित्रपटानंतर शाहरूख त्याकडे वळणार असल्याचे बोलले जात आहे. सुपरहिट फॉर्म्युल्याचा मिडास टच अनुभवण्यासाठी निर्माते आसुसलेले असल्याने अनेक यशस्वी चित्रपटांचे सिक्‍वेल दोन ते तीन वर्षांत पाहायला मिळणार हे नक्की.

"स्टुडंट ऑफ द इयर‘मध्ये पुन्हा लव्ह ट्रॅंगल
तरुणाईच्या प्रेमसंबंधांवर भाष्य करणाऱ्या "स्टुडंट ऑफ द इयर‘ चित्रपटात करण जोहरने नव्या दमाची आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा व वरुण धवन अशी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शनाच्या क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री केली होती. आता त्याचाही सिक्‍वेल येत असून, हिरोईनच्या भूमिकेसाठी एखाद्या स्टारकिडलाच तो संधी देणार असल्याचे बोलले जातेय. पहिल्या चित्रपटात दोन हिरो आणि एक हिरोईन होती; परंतु त्याच्या सिक्‍वेलमध्ये एक हिरो आणि दोन हिरोईन असा लव्ह ट्रॅंगल असेल.

Web Title: Bollywood sequels example Overriding