Shah Rukh Khan: 'पठाण' खुश हुआ! मन्नतच्या बाल्कनीत शाहरुखचा डान्स..चाहत्यांची जत्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan 
Pthaan

Shah Rukh Khan: 'पठाण' खुश हुआ! मन्नतच्या बाल्कनीत शाहरुखचा डान्स..चाहत्यांची जत्रा

Shah Rukh Khan Dances For Fans: बॉलिवूडचा बादशाह म्हणुन ओळख असलेला शाहरुख खान याने पुन्हा बॉलिवूडवरील त्याच वर्चस्व सिद्ध केलं. त्याने चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्याच्या 'पठाण'ने अनेक रेकॉर्ड तोडले. 'पठाण' रिलीज झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये शाहरुखच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे.

काही ठिकाणी चाहते थिएटरमध्ये नाचत आहेत, तर काही ठिकाणी फटाके फोडले जात आहेत. 'पठाण' मुळे बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर अच्छे दिन आले आहे असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.

'पठाण'ने अवघ्या 5 दिवसांत 500 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले तरी अजूनही चित्रपटगृह हाउसफुल आहेत. चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम आणि प्रतिसाद पाहून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही.

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याखाली चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुख खानही चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी अचानक बाहेर आला आणि मन्नतच्या बाल्कनी आला. शाहरुखला पाहताच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला आणि प्रत्येकजण त्याचे फोटो क्लिक करू लागला. शाहरुखने वारंवार सर्व चाहत्यांचे हात जोडून त्यांच्या अफाट प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. शाहरुख सर्वांसमोर मस्तक नमवून त्यांना धन्यवाद करत होता.

त्याचबरोबर शाहारुख खानने चाहत्यांसाठी 'झूम जो पठाण' गाण्याच्या डान्स स्टेप्सही दाखवल्या. शाहरुखने बाल्कनीत डान्स सुरू करताच चाहत्यांनी तुफान जल्लोष सुरू केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, शाहरुखने चाहत्यांसह ट्विटरवर एसआरकेचं सेशनही सुरु केलं होतं.