Palak Muchhal Wedding: पलक मुच्छाल मिथुनसोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Palak Muchhal Wedding

Palak Muchhal Wedding: पलक मुच्छाल मिथुनसोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात...

बॉलीवूडमध्ये यंदा लग्नाचा सिजन सूरु असल्याचं दिसत आहे. अनेक मोठमोठ्या  स्टार्संनी यंदा लग्न केले. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ते अली फजल आणि रिचा चढ्ढा,राजकुमार राव,यांची नावे आहेत. तर सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल राहुल तसेच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या असतांना बॉलीवूड सिंगर पलक मुच्छाल हिने देखिल तिच्या लग्नाची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिलाय.

हेही वाचा: Palak-Mithoon Wedding: 'मेरी आशिकी तुम हो' सिंगर पलक-मिथुनचं ठरलं!

'चाहू मैं या ना' आणि 'मेरी आशिकी...' यांसारखे हिट गाणे आणि आपल्या आवाजाने सर्वांना मत्रंमुग्ध करणारी बॉलीवूड सिंगर पलक मुच्छाल लवकरच विवाह बंधणात अडकणार आहे. ती संगीतकार मिथुनसोबत विवाह करणार आहे. यादोघांच्या लग्नाचे विधी 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबरला पलक-मिथुन लग्न करतीलं.

4 तारखेपासून हळदी, मेहंदी व संगीत सोहळा सुरू होणार आहे. या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांव्यतिरिक्त बी-टाऊनचे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. पलक आणि मिथुनचे लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे. यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल 5, 6 आणि 7 तारखेसाठी बुक करण्यात आले आहे. पलक आणि मिथुन यांनी लग्नानंतर बॉलीवूड रिसेप्शन पार्टी देखील आयोजित करणार आहेत. ही पार्टी मुंबईत होणार असून, त्यात नामवंत सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात.

हेही वाचा: Big Boss 16: अन् सलमान संतापला! अब्दू रोजिक बिग बॉस बाहेर?

दोघांनी पहिल्यांदा 'आशिकी 2' मध्ये एकत्र काम केले होते. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. म्हणजेच दोघेही जवळपास 9 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मात्र, दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची बातमी आहे.

पलकने चॅरिटीसाठी गाण्यांनी सुरुवात केली आणि त्याचे खाजगी अल्बम रिलीज केले. त्याच बरोबर तिने आशिकी २, आर... राजकुमार, जय हो, किक, गब्बर इज बॅक, बाहुबली: द बिगिनिंग, प्रेम रतन धन पायो, एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरीसाठी यांसारखी हिट गाणी गायली आहेत.

तर मिथुनने 2005 मध्ये जहर चित्रपटातील वो लम्हे या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांने अनवर, मर्डर 2, जिस्म 2, आशिकी 2, एक व्हिलन ते हाफ गर्लफ्रेंड, कबीर सिंग, राधे श्याम आणि शमशेरा यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली.