हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सुझेनला कोरोनाची लागण |Bollywood Superstar Hrithik Roshan ex wife Susanne khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Krish Hero Hrithik Roshan wife sussane
हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सुझेनला कोरोनाची लागण

हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सुझेनला कोरोनाची लागण

बॉलीवूडमध्ये (Bollywood) कोरोनाचं संक्रमण (Corona) वेगानं होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण सेलिब्रेटींना (Celebrity covid positive) झाली आहे. सुरुवातीला करिना कपूर, अमृता अरोरा यांना करण जोहरच्या (Karan Johar) पार्टीमध्ये गेल्यावर कोरोना झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर वेगवेगळे सेलिब्रेटी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. थोड्यावेळापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर बॉलीवूडच्या क्रिशच्या हृतिक रोशनच्या (Bollywood Krish Hero Hrithik Roshan) पूर्वाश्रमीच्या पत्नीला कोरोना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ओमीक्रॉन (Omircron) या कोरोनाच्या नव्या व्हायरसनं सर्वांची चिंता वाढवली आहे. त्याचा मोठा गंभीर परिणाम सध्या होताना दिसतो आहे. त्याच्या विळख्यात अनेकजण सापडले आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेकांना कोरोना झाला आहे. गेल्या महिनाभरापासून कित्येक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तर लाखो जणांना कोरोना होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सुजेन खानला कोरोना झाला आहे. तिनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं आहे.

हेही वाचा: 'Pushpa': रश्मिका ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

हृतिक आणि सुजेनचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला आहे. सुजेन ही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करुन चाहत्यांची पसंती मिळवताना दिसते. सुजेननं आता जो फोटो पोस्ट केला आहे त्यामध्ये ती वर्कआऊटच्या ड्रेसमध्ये आहे. ते फोटो शेयर करताना तिनं पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते की, दोन वर्षे कोरोनाला चकवा दिला होता. आता मात्र त्यानं आपल्याला गाठलचं. सध्या वातावरण अतिशय भयानक आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. असे आवाहन तिनं चाहत्यांना केलं आहे.

हेही वाचा: Pushpa Box Office : 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top