Ranveer singh News : बारा वर्षाच्या करियरमध्ये फक्त सहा हिट चित्रपट ! तरी अभिनेत्याचं नाव मोठं,कारण.. | Bollywood News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh Birthday, Entertainment News, Bollywood News in Marathi
रणवीरच्या सहाच चित्रपटात त्याने लाईफ टाईम सक्सेस मिळवलं. याचा अंदाज हिट चित्रपटांचा इतिहास बघताच तुम्हाला येईल.

बारा वर्षाच्या करियरमध्ये फक्त सहा हिट चित्रपट ! तरी अभिनेत्याचं नाव मोठं,कारण..

बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर आज वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण करतोय.कधी विनोद करत तर कधी एनर्जेटिक स्टेज परफॉर्मंस करत रणवीर चाहत्यांची मनं जिंकत असतो.रणवीरचा स्वभाव खरं हसत खेळत असल्याने जिथे रणवीर जातो तिथे त्याचे चाहते निर्माण होतात.१९८५ मध्ये मुंबईत जन्मलेल्या रणबीरनं बारा वर्षाच्या करियरमध्ये एकूण १५ चित्रपट केलेत आणि त्यापैकी निम्मे सहा चित्रपट हिट झालेत तरी रणवीर सिंगची गणना बॉलीवुडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये कशी काय असा प्रश्न तुम्हा अनेकांना पडलाही असेल. (Bollywood News in Marathi)

आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याचं सक्सेक सिक्रेट.रणवीरच्या सहाच चित्रपटात त्याने लाईफ टाईम सक्सेस मिळवलं. याचा अंदाज हिट चित्रपटांचा इतिहास बघताच तुम्हाला येईल.(Entertainment News)

गोलियों की रासलीला राम-लीला

रणवीरने बँड बाजा बारात या चित्रपटातून जरी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले असले तरी त्याला खरी ओळख २०१४ च्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटाने दिली. चित्रपटातील दीपिका आणि रणवीरच्या या जोडीने बॉक्स ऑफिसवर धमाल केली.या चित्रपटातील लव स्टोरी प्रेक्षकांना एवढी आवडली की हा चित्रपट थिएटरमध्ये येताच रणवीर सुपरस्टार झाला.त्यावेळी संजय लीला भंसाळीच्या या चित्रपटाला ८० कोटींचा खर्च लागला होता.मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २२० कोटींची कमाई केली होती.

गुंडे

२०१४ हे वर्ष रणवीरसाठी फार लकी ठरले असं म्हणायला हरकत नाही.'गुंडे' हा रणवीरचा चित्रपट २०१४ सालीच रिलीज झाला होता.४८ कोटींचा बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ७८ कोटींचे कलेक्शन केले.

बाजीराव मस्तानी

रणवीरच्या प्रत्येक हिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या बजेटच्या दुप्पट पैसे कमावले आहेत.संजय लीला भंसाळीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा बजेट १४५ कोटींचा असताना रणवीरच्या या चित्रपटाने ३०० करोडची कमाई केली होती.

पद्मावत या चित्रपटात रणवीरने खिलजी बनून प्रेक्षकांना चकित केलं होतं.यावेळी चित्रपटाच्या यशाचं श्रेय रणवीरला दिल्या गेलं.२१५ कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ५५० कोटींची कमाई केली.

रणवीरच्या 'सिंबा' ने ही ८० कोटींचा बजेट असताना २४० कोटींची कमाई केली.तर 'गल्ली बॉय' चित्रपटाचाही विक्रम निराळाच आहे.५५ कोटीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची कमाई केली होती.

Web Title: Bollywood Superstar Ranveer Singh Done 15 Movies Only 6 Hit Movies Out Of Them Still He Rock In Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..