Tamannaah Bhatia: अभिनेत्यासोबत नव्हे तर ‘या’ तरुणासोबत तमन्ना लवकरचं अडकणार विवाह बंधनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia: अभिनेत्यासोबत नव्हे तर ‘या’ तरुणासोबत तमन्ना लवकरचं अडकणार विवाह बंधनात

दाक्षिणात्य सुंदरी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. तिचा अभिनय असो किंवा ग्लॅमरस अदा तिचे चाहते नेहमीच तिच्यावर फिदा असतात. ती सर्वांचीच आवडती आहे. तमन्नाला मोठ्या पडद्यावर 17 वर्षे झाली असली तरी तिची लोकप्रियता कायम आहे.

सध्या बॉलिवूडवरच नव्हे तर टॉलिवूडवरही लग्न सराईचे वारे वाहत आहे. कियारा सिद्धार्थ, हसिंका मोटवाणी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्याच यादीत तमन्नाताही सामावेश होणार आहे. ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काही दिवसांत तमन्नाच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लग्नाशी संबंधित अनेक बातम्या याआधीच चर्चेत आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर आणखी एक बातमी व्हायरल होत आहे, मात्र यावेळी तमन्नाने तिच्या लग्नाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिने या बातम्यांना होकार दिला नसला तरी नाकारलेलेही नाही.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

आता तमन्नाचे चित्रपटही जवळपास पूर्ण झाले आहेत. ती कोणताही नवीन प्रोजेक्ट घेत नसून ती लवकरच लग्नाच्या तयारीत व्यस्त होणार आहे. तिला स्वतःसाठी देखील थोडा वेळ हवा आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, तमन्नाला एका बिझनेसमनचा प्रस्ताव आला आहे. तिने तो स्वीकारला असून लग्नासाठी होकारही दिला आहे. लग्नाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा: Big Boss 16: बिग बॉसने स्वत:च्या फायद्यासाठी नियम ठेवले धाब्यावर? अर्चनाच्या एंन्ट्री...

तमन्नाने आपल्या लग्नाचा निर्णय तिच्या पालकांवर सोडल्याचे अनेकदा सांगितलं आहे. आधीही तम्मनाला लग्नाविषयी विचारण्यात आलं तेव्हा लग्नाविषयी बोलताना तमन्नाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, लोक लग्नाला खूप महत्त्व देतात. योग्य वेळ आल्यावर मी लग्न करणार असल्याचं ती म्हणाली होती. तमन्नाच्या लग्नाची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेत्रीच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या.