‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते लीलाधर सावंत पडद्याआड

बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सिनेमांचं कला दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच निधन झालं आहे.
‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते लीलाधर सावंत पडद्याआड

मुंबई - बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सिनेमांचं कला दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजारांने ग्रस्त होते. त्यांनी वाशिमच्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी १७०हून जास्त चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनचे काम केलं आहे.त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तसेच त्यांना ब्रेन ह्रेमरेजही झालं होतं. लीलाधर सावंत यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत लीलाधर सावंत यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या बिकट परिस्थितीचा खुलासा केला होता. एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत लीलाधर यांच्या पत्नीने कसे ते खडतर आयुष्य जगत आहे हे सांगितले होते .

"लीलाधर यांच्या दोन बायपास सर्जरी झाल्या असून त्यांना दोनदा ब्रेन हॅमरेजचे अटॅक आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारांवर सर्व पैसे खर्च झाले आहे. आता लीलाधर यांना बोलणंही शक्य होत नाही." असं त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी सांगितलं. हत्या’ या सिनेमासाठी लीलाधर यांनीच गोविंदाचं नाव सुचवलं होतं असं पुष्पा यांनी या मुलाखतीत सांगितलं. “सध्या आम्ही दोघं कठीण काळात असून मुश्किलीने आमचं जीवन व्यतीत करत आहोत.” असं पुढे त्या म्हणाल्या. यावेळी पुष्पा यांनी सेलिब्रिटींकडे मदतीची याचनादेखील केली होती.

लीलाधर यांनी तब्बल २५ वर्ष काम केले, त्यात त्यांनी सागर, हत्या, १००डेज, दिवाना, हद कर दी आपने अशा चित्रपटांना कला दिग्दर्शन केलं होतं. दादासाहेब फाळकेसोबतच त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि माणिकचंद पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते लीलाधर सावंत पडद्याआड
शाहरुख-आर्यन भेटी दरम्यान तुरुंगात नेमकं काय घडलं?
‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते लीलाधर सावंत पडद्याआड
'प्रत्येक बातमी, 'बातमी' नसते, तुमच्यावरही आहे देवाचा कॅमेरा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com