अभिनेता विक्रमला बॉम्बने उडविण्याची भाषा करणारा 'अपरिचित'

Bomb threat to actor Vikram house
Bomb threat to actor Vikram house

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांचा आवडता अभिनेता म्हणून  विक्रमचे नाव घ्यावे लागेल. मात्र आता तो भलत्याच एका मोठ्या संकटात सापडला आहे याचे कारण म्हणजे त्याला कुणीतरी एकानं चक्क बॉम्बनं उडविण्याची धमकी दिली आहे. त्याचं घर उडवून देण्याची भाषा करणा-या फोनने भीतीचे सावट पसरल्याचे दिसून आले आहे.

अशाप्रकारची धमकी मिळताच विक्रमने तातडीनं त्याची कल्पना पोलिसांना दिली त्यांनी तपासाला सुरुवात केली. मात्र विक्रमच्या घरात कुठल्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आला नाही. बॉम्ब शोधक पथकानं तपासणी केली मात्र त्यात त्यांना काही मिळालं नाही. यापूर्वी विजय, अजित, सुर्यकांत, रजनीकांत, सूर्या यांना देखील असे धमकीचे फोन आले होते. दरम्यान पोलीस फोन करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मानसिकरित्या आजारी असलेला व्यक्ती असे फोन करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vikram (@the_real_chiyaan)

चेन्नईतील बेसंट नगरच्या भागात विक्रम राहतो. या भागात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी राहतात. पोलिसांनी देखील बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीनं त्याच्या घराची कसून तपासणी केल्यानंतरही त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com