मोदींच्या बायोपिकला स्थगिती द्या, न्यायालयात याचिका

modi
modi

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे. आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्यावर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. 

संदीप सिंग या सिनेमाचे निर्माते असून या सिनेमात विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय या सिनेमात बरखा बिष्ट, मनोज जोशी, बोमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आदी दिसणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com