esakal | Defamation Case : कंगनाला दिलासा नाहीच; १४ सप्टेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती
sakal

बोलून बातमी शोधा

kangana javed

Defamation Case : कंगनाला दिलासा नाहीच; १४ सप्टेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी अभिनेत्री कंगना रणौतने Kangana Ranaut मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगनाच्या या याचिकेवर आक्षेप घेत अख्तर यांनी ही याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत सुनावणीला स्थिगिती दिली आहे. तर दुसरीकडे अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंगना आज (बुधवारी) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना अंधेरी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: KBC 13: सात कोटी रुपयांच्या 'जॅकपॉट' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याविषयी काही वादग्रस्त विधानं केली. यावरून अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानिची तक्रार दाखल केली होती. कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने डिसेंबरमध्ये जुहू पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. जुहू पोलिसांनी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या चौकशीच्या अहवालात कंगनाविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि प्रकरणाच्या पुढील चौकशीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर कंगनाला फेब्रुवारी २०२१ मध्ये समन्स बजावले गेले.

loading image
go to top