आगामी रोमँटिक-कॉमेडी सिनेमात 'हे' दोन कलाकार साकारणार रणबीर कपूरच्या आई-वडिलांची भूमिका

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 11 January 2021

या भूमिकेसाठी बोनी कपूरंच निर्मात्यांची पहिली निवड होते. सिने निर्माते बोनी कपूर यांनी सुरुवातीला ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता मात्र लवने त्यांना हे पात्र साकारण्यासाठी खूप विनंती केली.

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ९ जानेवारी रोजी लवरंजनच्या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी नोएडा इथे पोहोचले. आत्तापर्यंत या सिनेमाचं शिर्षक ठरवलेलं नाही.मात्र रविवारी असं सांगितलं गेलं की सिने निर्माता  बोनी कपूर यांनी नुकतंच अनिल कपूर स्टारर एका सिनेमामाध्ये अभिनयात पदार्पण केलं आहे.   

बिग बॉस १४: जॅस्मिन भसीनच्या एविक्शनमुळे अली गोनी ढसाढसा रडला, आला पॅनिक अटॅक  

सिने निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर या सिनेमामध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. डिंपल कपाडिया ज्यांनी रणबीरचे वडिल आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या 'बॉबी' सिनेमात मुख्य भूमिता साकारली होती त्या या सिनेमामध्ये बोनी कपूर यांच्या पत्नी आणि रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकरणार आहेत. 

सिनेमाशी संबंधित एका जवळच्या सुत्राने सांगितलं की रणबीरचे वडिल एक श्रीमंत आणि आत्मविश्वासी व्यक्ति आहेत. स्क्रीप्ट रायटरला वाटत होतं की बोनी कपूर सारख्या व्यक्तीने ही भूमिका साकारावी. या भूमिकेसाठी बोनी कपूरंच त्यांची पहिली निवड होती. सिने निर्माते बोनी कपूर यांनी सुरुवातीला ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता मात्र लवने त्यांना हे पात्र साकारण्यासाठी खूप विनंती केली.

Dimple Kapadia & Boney Kapoor Roped In For Luv Ranjan's Next; Will Play  Ranbir Kapoor's Parents - DesiMartini

त्यांनी अर्जुन कपूरला बोनी यांना समजवायला सांगितलं. त्यानंतर अर्जुन लगेचच बोनी यांच्याकडे पोहोचले. अर्जुन, अंशुला, जान्हवी आणि खुशी या सगळ्यांनी त्यांना या भूमिकेसाठी समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी बोनी या भूमिकेसाठी तयार झाले. सध्या बोनी कपूर हैद्राबादमध्ये शूटींग करत आहेत. ते आज सोमवार ११ जानेवारी रोजी या सिनेमाच्या सेटवर पोहोचतील. या रोमँटीक कॉमेडी सिनेमाचं शूटींग स्पेनमध्ये एका शेड्युलसोबत सुरु होणार होती मात्र स्पेनमध्ये अजुनही कोरोनाचं संकट असल्या कारणाने निर्मात्यांनी भारतातंच शूट करण्याचा निर्णय घेतला.     

boney kapoor and dimple kapadia to play ranbir kapoor parents in romantic comedy film  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boney kapoor and dimple kapadia to play ranbir kapoor parents in romantic comedy film