'धर्मवीर'चा नवा विक्रम! दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई..

'धर्मवीर' चित्रपटाला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतोच आहे.
dharmveer movie crossed 18.03 crore
dharmveer movie crossed 18.03 croresakal

Marathi Movie : दिग्दर्शक प्रवीण तरडे (pravin tarde) दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अकरा दिवस झाले. दिवसेंदिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतोच आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि (Box Office) १० हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट गाजतो आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने हाऊसफुल्ल चा शिरस्ता कायम ठेवला आहे. 'धर्मवीर'ने पहिल्या आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही आनंदवार्ता ठरली. आता आणखी एक विक्रम समोर आला आहे. (dharmveer marathi movie) (box office marathi movie dharmveer crossed 18.03 crore in 10 days)

dharmveer movie crossed 18.03 crore
अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार

हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक (prasad oak) यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहेच. मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे केवल ठाणेकरच नाही तर अवघा महाराष्ट्र आनंद दिघे यांच्या चित्रपटावर प्रेम करत आहेत.

याच प्रेमाची पावती म्हणजे दहा दिवसात चित्रपटाने १८.०३ कोटींची कमाई केली आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. आता तीन दिवसांत या सिनेमाने 9.59 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात तेरा कोटी तर आता १८ कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com