'बिग बॉस'च्या घरात अटीतटीची स्पर्धा, याआधी काम्या-संग्राम लहानशा खोक्यात होते ४१ तास बंद

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कवर प्रेक्षक खुश नाहीत. त्यांनी या बॉस्कवाल्या टास्कची तुलना 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनमध्ये झालेल्या टास्कशी केली आहे. 

मुंबई- ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिऍलिटी शोपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा शो सुरु होऊन आता बिग बॉस सुरु होऊन एक महिना झाला. प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसतोय. यावेळी बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीसाठी एक टास्क झाला. या टास्कमध्ये जॅस्मिन भसिन आणि कविता कौशिक या दोन स्पर्धकांनी भाग घेतला होता. मात्र हा टास्क जिंकण्यासाठी दोन्ही स्पर्धक जवळपास २० तास एका लहानशा खोक्यात बंद राहिले होते.

हे ही वाचा: ‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गई है’, राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला    

'बिग बॉस'च्या घरात कॅप्टनला खूप जास्त महत्व आणि तेवढीच जबाबदारी देखील असते. कॅप्टन्सी मिळाल्यानंतर एलिमिनेशनमधून तर तो वाचतोय शिवाय अनेकदा या प्रमुखाला वेगवेगळे फायदे अनुभवायला मिळतात. या नियमामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती कॅप्टन होण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करताना दिसतात. मात्र या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कवर प्रेक्षक खुश नाहीत. त्यांनी या बॉस्कवाल्या टास्कची तुलना 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनमध्ये झालेल्या टास्कशी केली आहे. 

Bigg Boss 7: Kamya, Sangram win the box task, break record - tv - Hindustan  Times

विशेष म्हणजे त्यावेळी काम्या पंजाबी आणि संग्राम सिंह हे दोन स्पर्धक तब्बल ४१ तास १६ मिनिट एका लहानशा खोक्यात बंद राहिले होते. हा टास्क केवळ एक मिनिटांनी काम्याने जिंकला होता. आत्तापर्यंत हा रेकॉर्ड 'बिग बॉस'मध्ये कोणालाही मोडता आलेला नाही. शिवाय अशी अटीतटीची स्पर्धा १४ व्या सिझनमध्ये देखील पाहायला मिळत नाहीये अशी तक्रार हा बॉस्कवाला टास्क पाहून 'बिग बॉस'चे चाहते करत आहेत. या टास्कने सगळ्यांनाच जुन्या सिझनची आठवण करुन दिली आहे. 

box task in bigg boss 14 reminds fans of season 7 contestants kamya punjabi and sangram singh  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: box task in bigg boss 14 reminds fans of season 7 contestants kamya punjabi and sangram singh