esakal | रणवीर झाला 'बिंगो',सुशांतची खिल्ली उडवणं महागात
sakal

बोलून बातमी शोधा

bingo ad

भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी सुशांतच्या चाहत्यांनी रणवीरवर टीका केली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. रणवीरची बिंगोची नवी जाहिरात प्रदर्शित झाली आहे.

रणवीर झाला 'बिंगो',सुशांतची खिल्ली उडवणं महागात

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराविषयी कुणी काही बोलल्यास चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात दिवंगत अभिनेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वसामान्य चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक प्रकार आता बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत झाला आहे. तो करत असलेल्या बिंगोच्या जाहिरातीतून दिवंगत अभिनेला सुशांत सिंग राजपूत याचा अपमान झाल्याचे सुशांतच्या चाहत्यांनी म्हटले आहे. 

भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी सुशांतच्या चाहत्यांनी रणवीरवर टीका केली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.  रणवीरची बिंगोची नवी जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये रणवीर बिंगो खात असून जाहिरातीच्या सुरुवातीला रणवीरच्या घरी काही पाहुणे आले आहेत.

हे पाहुणे रणवीरला त्याच्या भविष्याचे काय प्लॅन आहेत का असे विचारतात. तेव्हा रणवीर बिंगो खातो. त्यानंतर मार्स, फोटॉन, एलियन या शब्दांचा वापर करत उत्तर देतो आणि पाहुण्यांचे तोंड बंद करतो.

जाहिरातीच्या माध्यमातून रणवीरने सुशांतची खिल्ली उडवली आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी रणवीरवर निशाणा साधत जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणावरुन रणवीरवर टीका होत आहे. त्याच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी टीका केली आहे.

या जाहिरातीमध्ये रणवीरने वापरलेले शब्दांमुळे चाहत्यांनी रणवीरवर टीका केली आहे. त्यांनी ही जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ट्विटवर हॅशटॅग BoycottBingo देखील ट्रेंड होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले तर काहींनी नैराश्यामुळे सुशांतने इतके टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सचे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची एक जाहिरात बॉयकॉट करण्याची मागणी सुशांतच्या चाहत्यांनी केली आहे.