'दबंग थ्री'मुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; ट्विटरवर #BoycottDabangg3 ट्रेंड

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

दबंगच्या गाण्यातील दृष्यांमुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळं दबंग सिनेमालाच विरोध होत आहे. 

मुंबई : सूपरस्टार सलमान खानचा दबंग थ्री प्रदर्शनापूर्वीच वादात अडकला. सिनेमातील एका गाण्यावरून सुरू झालेला हा वाद इतका टोकाला गेलाय की, ट्विटरवर आज, #BoycottDabangg3 असा ट्रेंड सुरू झालाय. दबंगच्या गाण्यातील दृष्यांमुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळं दबंग सिनेमालाच विरोध होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप

काय आहे आक्षेप?
सलमान खानच्या महत्त्वाकांक्षी दबंग थ्री सिनेमातील गाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने रिलीज करण्यात येत आहेत. त्यातलं हूड हूड दबंग हे गाणं गेल्या आठवड्यात रिलीज झालंय. मध्य प्रदेशात महेश्वर येथे नर्मदा नदीच्या काठावर हे गाणं शूट झालंय. गाण्यात अनेक साधून नाचताना दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर शंकर, कृष्ण आणि रामाच्या वेशभूषेतील मुलंही गाण्यात सलमानसोबत नाचताना दिसत आहेत. या दृष्यांना सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आलाय. गाण्यात साधू गिटार वाजवताना दिसत आहेत. त्यामुळचे सध्या ट्विटरवर #BoycottDabangg3 असा ट्रेंड सुरू झालाय. काहींनी या संदर्भातील क्रिएटिव्ह पोस्ट शेअर कराला सुरुवात केली आहेत. ज्या सिनेमात हिंदूंच्या भावनांचा अपमान झाला. त्या दबंग थ्रीला बॉयकॉट करा, असं आवाहनही ट्विटरवरून करण्यात येत आहे. 

सलमानला कोर्टाकडून दिलासा
दरम्यान, लव्ह यात्री सिनेमाची निर्मिती केल्यावरून सलमान खान विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात कोर्टाने सलमान खानला दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी लव्ह यात्री हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातूनही धार्मिक भावना दुखवल्या गेल्याची तक्रार याचिके द्वारे करण्यात आली होती. त्यावर सलमान विरोधात कोणतिही जबरदस्तीची कारवाई करण्यात येणार नसल्याचे कोर्टानं स्पष्ट केलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boycott dabangg 3 trending on Twitter salman khan