'Boycott Jersey' ट्रेंड व्हायरल, शाहिदचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं!|Boycott Jersey Movie Twitter trending | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jersey movie

'Boycott Jersey' ट्रेंड व्हायरल, शाहिदचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं!

Bollywood News: बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी नावाचा (Shahid Kapoor) चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. दोन वर्षांपासून या चित्रपटाची (Jersey Movie) मनोरंजन विश्वामध्ये चर्चा आहे. वास्तविक गेल्या आठवड्यातच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र केजीएफचा दुसरा चॅप्टर प्रदर्शित होणार (Entertainment News) असल्यानं त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. जर्सीच्या मागे सुरु झालेला वाद मात्र काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. आता सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी (Boycott Jersey) नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे.त्याचा फटका शाहिदच्या जर्सीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामागील नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. जर्सी हा टॉलीवूडच्या त्याच नावावरील चित्रपटावर आधारित चित्रपट आहे.

जर्सीचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याची चर्चा सुरु झाली. तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसून आले. मात्र दरम्यानच्या काळात जर्सीच्या भोवती एक वाद चिकटला. काही दिवसांपूर्वी जर्सी हा कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. त्याचे कारण म्हणजे कॉपीराईटचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र कोर्टानं जर्सीच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दाखवत निर्मात्यांना दिलासा दिला. आता सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. जर्सीमध्ये शाहिद आणि मृणाल ठाकुर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. ट्विटवर बॉयकॉट जर्सी नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे.

हेही वाचा: 'तु जितना मांग रहा है, उतनी तेरी कमाई नही', Jersey Trailer

चित्रपटाला विरोध होण्याचे कारण म्हणजे, शाहिद कपूरनं सुशांत सिंग राजपूतची केलेली टिंगल. यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. काही वर्षांपूर्वी शाहिदनं एका अॅवॉर्ड शोमध्ये निवेदकाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी त्याच्याबरोबर बॉलीवूडचा किंग खान शाहरुखही होता. दरम्यान त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अभिनेता सुशांत सिंगची टिंगल केली होती. त्याचा अपमान केला होता. असे सुशांतच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या जर्सी नावाच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याच मागणी पुढे येताना दिसत आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, त्यावेळी शाहिदनं सुशांतचा अपमान केला होता. आता वेळ आली आहे त्याला उत्तर देण्याची. त्यामुळे सगळ्यांनी बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची गरज असल्याचे त्या युझर्सनं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट जर्सी नावाचा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतो आहे.

Web Title: Boycott Jersey Movie Twitter Trending Hashtag Actor Shahid Kapoor Trolled Sushant Singh Rajput

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..