'मंदिरात किस केलं म्हणून #BoycottNetflix'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

अ सुटेबल बॉय नावाची वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर साधारण  महिन्यापूर्वी प्रदर्शित झाली होती. आता त्या मालिकेतील एका दृश्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद इतका ताणला गेला आहे की त्यावरुन सोशल मीडियावर #BoycottNetflix' हा ट्रेंड सुरु झाला आहे. 

मुंबई - कलाकृती आणि तिच्यातील आशय हा राहिला बाजूला त्यापेक्षा त्यावरुन वाद उकरुन सामाजिक वातावरण कसे ढवळून निघेल असा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींकडून केला जात असल्याचे दिसून आले आहे.

अ सुटेबल बॉय नावाची वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर साधारण  महिन्यापूर्वी प्रदर्शित झाली होती. आता त्या मालिकेतील एका दृश्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद इतका ताणला गेला आहे की त्यावरुन सोशल मीडियावर #BoycottNetflix' हा ट्रेंड सुरु झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्य़ा प्रकारचे वाद सुरु झाले आहेत. त्यात तनिष्कची जाहिरात असेल, अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट असो किंवा आश्रम वेबसीरीजमधील काही भागांवर घेतलेला आक्षेप असेल याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचं काम सोशल मीडियातून करण्यात आले. त्यासाठी खास हॅशटॅगही सुरु केले गेले. आता पुन्हा अशाच एका वेबसीरीज मधील एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्य़ावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

Image

 प्रसिध्द दिग्दर्शक मीरा नायर दिग्दर्शित आणि बीबीसी यांनी निर्मिती केलेल्या अ सुटेबल बॉय या नव्या वेबसीरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. जाणकार रसिक, अभ्यासकांनी या मालिकेचे कौतूक केले आहे. असे असताना काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना ही बाब खटकली आहे. य़ा मालिकेतील नायक नायिकेचे मंदिरात चुंबन घेतानाचे दृश्य दाखविण्यात आले आहे. त्यावरुन सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे.  आणि #BoycottNetflix' ची मागणी करण्यात येत आहे.

आता काय बोलायचं,प्रसिध्द कलाकारानं चारवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न​

काही दिवसांपूर्वी व्टिटरवर तनिष्कच्या जाहिरातीवर त्या जाहिरातीतून लव जिहादचा प्रचार होत असल्याची टीका करण्यात आली होती. अखेर कंपनीला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. आता विक्रम सेठ लिखित प्रसिध्द कादंबरी अ सुटेबल बॉयवर तयार करण्यात आलेल्या वेबसीरीजवरही आगपाखड करण्यात येत आहे. त्यात दाखविण्यात आलेल्या दृश्यातून लव जिहादचा प्रचार होत असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे. याप्रकरणी बीजेपीचे नेते गौरव तिवारी यांनी नेटफ्लिक्सच्या विरोधात मध्यप्रदेश पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे.

बॉलिवूड सोडलेल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न; पाहा VIDEO​

तिवारी यांनी एफआयरची कॉपी सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्याला नेटक-यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात #BoycottNetflix' सुरु करण्यात आला आहे. या मालिकेतील लता नावाचे एक पात्र आहे. तिचे एका मुस्लिम तरुणावर प्रेम आहे. तो तिला भेटण्यासाठी मंदिरात आल्यानंतर किस करतानाचे दृश्य मालिकेत दाखविण्यात आले आहे. याप्रकारचे दृश्य मशिदीच्या समोर का नाही चित्रित करण्यात आले असा प्रश्न तिवारी यांनी निर्मात्यांना विचारला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott Netflix trends after controversy over shooting of kissing scene in temple