शिवसेना मराठी सिनेसृष्टीच्या कायम पाठीशी- उद्धव ठाकरे

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

शिवसेना मराठी सिनेसृष्टीच्या कायम पाठिशी उभी राहीली आहे. यापुढेही कायम पाठीशी उभी राहील अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाॅईज या चित्रपटातील कलाकारांची पाठ थोपटली. 

मुंबई : शिवसेना मराठी सिनेसृष्टीच्या कायम पाठिशी उभी राहीली आहे. यापुढेही कायम पाठीशी उभी राहील अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाॅईज या चित्रपटातील कलाकारांची पाठ थोपटली. 

'बॉईज' सिनेमाचा वेगळा आशय आणि विषयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अवघ्या १० दिवसांत या चित्रपटाने ८ कोटी ४० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सिनेमाच्या या घवघवीत यशानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'बॉईज' कलाकारांचे कौतुक केले. या चित्रपटाचे निर्माते लालासाहेब शिंदे, राजेद्र शिंदे, प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते, दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि  पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड, रितिका शोत्री या सिनेमातील प्रमुख कलाकारांनी महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

 

Web Title: boyz team meets udhdhav thakarey esakal news