Brahmastra : करण जोहरच्या उत्तराने युजर पडला तोंडघशी; घेतला ‘हा’ निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar News

Brahmastra : करण जोहरच्या उत्तराने युजर पडला तोंडघशी; घेतला ‘हा’ निर्णय

Karan Johar News आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. तरी अनेक कारणांनी चित्रपटाची खिल्ली उडवली जात आहे. बॉयकॉट ट्रेंडला फाटा देणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल अनेक मीम्स बनवले गेले आहेत. चित्रपटाचे संवादही ट्रोल केले जात आहेत. अलीकडेच चित्रपटाचा निर्माता करण जोहरने (Karan Johar) अशाच एका युक्तिवादावर प्रतिक्रिया दिली. ज्याच्या आधारे चित्रपटाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ट्विटरवर एक ट्विट खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या कथेची खिल्ली उडवली गेली आहे. ‘मला सांगा आश्रम तर गुप्त होते. मग गुगल मॅपवर त्याचा पत्ता कसा उपलब्ध होता? या तर्काच्या आधारावर चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली? ही भारतीय पद्धत आहे का?’ असे ट्विट मयंक मेहताने केले आहे.

हेही वाचा: Jhalak Dikhhla Jaa 10 : लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अली असगर बाहेर

‘गुरू जगात इतर सामान्य लोकांसारखे जगत होते. ते ब्राह्मांशचे नेते आहे हे कोणालाच माहीत नव्हते. त्यांचे घर हे शस्त्रांचे घर आहे. त्यामुळे या वास्तविक जगात त्यांच्या घराचा पत्ता गूगल मैपवर (Google Maps) उपलब्ध होता’ असे करण जोहरने (Karan Johar) युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना लिहिले.

ट्विट डीलिट केले

करण जोहरने ट्विट रिट्विट केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. तसेच रिट्विट केले गेले. त्यानंतर युजरने आपले ट्विट डीलिट केले. परंतु, त्याचा स्क्रीनशॉट अजूनही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ब्रह्मास्त्रने भारतीय बॉक्स ऑफिसवरच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Web Title: Brahmastra Movie Karan Johar User Speechless Google Map

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..