सॅक्रेड गेम्सच्या 'या' अभिनेत्याचा ब्राझीलमध्ये बोलबाला!

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

''मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीकडून माझ्या कामाची दखल घेतली गेल्याने माझा सन्मान झाला आहे. ही भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, धन्यवाद.''

मुंबई : 'सॅक्रेड गेम्स' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. कथा, पटकथा, पात्रं आणि कलाकारांचा अभिनय या गोष्टींमुळे या वेबसीरिजची देशभरातच नाही, तर जगभरात चर्चा झाली, अजूनही होत आहे. याचीच दखल ब्राझीलमधील जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएल्हो यांनी घेतली आहे.

Image may contain: 2 people, people standing

जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएल्हो यांनी अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटरवर 'सॅक्रेड गेम्स' या ऑनलाइन मालिकेची शिफारस करतानाच नवाझुद्दीनला महान अभिनेता असे गौरविले आहे.

नवाझुद्दीननेही कोएल्हो यांचे आभार मानले आहेत. "मी तुम्ही लिहिलेले 'अल केमिस्ट' वाचले आहे आणि तुमच्या कादंबदीवर आधारित 'व्हेरोनिका डिसाइड्‌स टू डाय' हा चित्रपटही बघितला आहे.''

Image may contain: 1 person, sitting and text

''मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीकडून माझ्या कामाची दखल घेतली गेल्याने माझा सन्मान झाला आहे. ही भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, धन्यवाद,'' असे नवाझुद्दीनने म्हटले आहे.

Image may contain: 2 people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazilian renowned writer Paulo Coelho praises actor Nawazuddin Siddiquis performance in Sacred Games