esakal | 'उगाचंच दिखावा करू नकोस'; नवाजुद्दीनवर भावाचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin and Shamas Siddiqui

'उगाचंच दिखावा करू नकोस'; नवाजुद्दीनवर भावाचा पलटवार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशात कोरोनाची भीषण परिस्थिती असताना सोशल मीडियावर मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने फटकारलं. "इथे लोकांना दोन वेळचं जेवण नीट मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाच बाळगा", अशा शब्दांत त्याने सेलिब्रिटींना सुनावलं होतं. मात्र आता त्याचा भाऊ शमस सिद्दिनी याने नवाजुद्दीनवर पलटवार केला आहे. 'उगाचंच चांगला माणूस बनण्याचा का प्रयत्न करतोस', असं ट्विट शमसने भावासाठी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्दिकी भावंडांमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

काय म्हणाला होता नवाजुद्दीन सिद्दिकी?

"एकीकडे जगभरात कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली असताना हे सेलिब्रिटी व्हेकेशनचे फोटो पोस्ट करत आहेत. इथे लोकांना जेवण मिळत नाहीये आणि तुम्ही पैसे उधळताय. थोडीतरी लाज बाळगा. सुट्ट्यांवर जाणं तितकं चुकीचं नाही जितकं त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं आहे. या लोकांनी मालदिवला तमाशा बनवून ठेवलाय. त्यांची पर्यटन उद्योगाशी काय व्यवस्था आहे मला माहित नाही. पण किमान माणुसकीखातर, तुमच्या व्हेकेशनचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. इथे सर्वत्र भीषण परिस्थिती आहे. कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांसमोर दिखावा करू नका", असं तो म्हणाला.

हेही वाचा : 'दंगल गर्ल'ने छेड काढणाऱ्याच्या कानशिलात लगावली; मुलाने हात उचलताच वडील आले धावून

शमसचा पलटवार

'तू इतका का चिडला आहेस? प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण कर भरतोय आणि देशाच्या विकासात आपलं योगदान देतोय. पण तुझं काय? समाजासाठी तू काय केलंस हे मला सांगू शकतोस का? कृपया उगाचंच चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नकोस', असं ट्विट शमसने केलं.

गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, दिशा पटान, सारा अली खान, जान्हवी कपूर हे सेलिब्रिटी मालदिवला फिरायला गेले होते. त्याआधी माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, समंथा अक्किनेनी, श्रद्धा कपूर त्याच ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. एकीकडे देशात कोरोनामुळे अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली असताना मालदिव किंवा इतर ठिकाणी सुट्ट्यांच्या आनंद घेणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर सर्वच स्तरांतून टीका होतेय.

loading image