निलांबरी बसमध्ये झाले 'बसस्टॉप'चे पोस्टर लाँच

Busstop new poster esakal news
Busstop new poster esakal news

मुंबई : मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित 'बसस्टॉप' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आले. एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली.

 त्यावर पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव,अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आणि हेमंत ढोमे हे चेहरे दिसत असून त्यांच्या चित्राखाली बोल्ड, बीजी, रोमान्स, एपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील विविध जीवनशैली मांडणारे शब्द देखील पाहायला मिळत आहेत. 
 
या सिनेमाच्या टिजर पोस्टरवर आजच्या देखण्या आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचे चेहरे जरी दिसत असले तरी, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांची देखील यात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीचा नवा आयाम मांडणारा ठरणार आहे.  यासर्व मल्टीस्टाररचा "बसस्टॉप'’ सिनेमा येत्या २१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com