कैरो चित्रपट महोत्सवात 'हाफ तिकीट'ची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई - समित कक्कड दिग्दर्शित, नानूभाई निर्मित "हाफ तिकीट' या मराठी चित्रपटाची कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. 16 ते 25 नोव्हेंबरदरम्यान रविवारी (ता. 20) दाखवला जाईल. वर्ल्ड पॅनोरमा विभागात जगातील सर्वोत्कृष्ट 15 चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

लहान मुलांच्या भावविश्‍वाचा वेध घेणारा हा चित्रपट 23 जुलैला प्रदर्शित झाला. आपल्याकडे नसलेली; परंतु हवीहवीशी वाटणारी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या दोन लहान मुलांची कथा त्यात आहे. या चित्रपटात शुभम मोरे व विनायक पोतदार या बालकलाकारांसह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस आदींच्या भूमिका आहेत. याआधी जयपूरला झालेला चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

याबाबत चित्रपटाचे निर्माते नानूभाई म्हणाले, या महोत्सवात वर्ल्ड पॅनोरमा विभागात हा एकमेव मराठी चित्रपट दाखल झाला आहे. बर्लिनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चित्रपट महोत्सवात तसेच जानेवारी महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या पामस्प्रिंग चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

भारतीय दूतावासाकडून डीनरचे आमंत्रण
या महोत्सवातील "हाफ तिकीट'च्या स्क्रिनिंगच्या वेळी "हाफ तिकीट'चे दिग्दर्शक समित कक्कड, मोहित जयसिंघानी, संजय मेमाणे आणि अनमोल भावे उपस्थित राहणार आहेत. इजिप्तमधील भारतीय दूतावासाने या चित्रपटाच्या टीमला डीनरचेही आमंत्रण दिले आहे.

Web Title: Cairo Film Festival 'Half tikitaci selection