प्रियंका चोप्राच्या बहिणीने कान्स गाजवले, रेड कार्पेटवर ‘सफेद’ चित्रपटाची हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meera chopra debut in Cannes 2022

प्रियंका चोप्राच्या बहिणीने कान्स गाजवले, रेड कार्पेटवर ‘सफेद’ चित्रपटाची हवा

Cannes 2022 : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेला कान्स फिल्म फेस्टिवल (cannes film festival) सध्या फ्रान्स (Cannes in France) मध्ये अत्यंत दिमाखात सुरु आहे. या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहिणीने (priyanka chopra cousin) खास लुक देत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. मीरा चोप्रा (meera chopra) असे तिचे नाव असून आजवर तिने प्रादेशिक भाषांतील चित्रपटांमध्ये बरेच काम केले आहे. सध्या ती 'सफेद' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रथमच प्रमुख भूमिका साकरणार आहे.

हेही वाचा: लाखात एक जोडा.. हृता दुर्गुळेच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल..

भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओजच्या 'सफेद' या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यासाठी थेट 'कान्स' ची निवड करण्यात आली. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर दाखल झाले. चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभिनेता अभय वर्मा, दिग्दर्शक-लेखक संदीप सिंग, निर्माते विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता त्यांनी भारताला ‘कन्ट्री ऑफ हॉनर’ म्हणून साजरे केले.

'सफेद' चित्रपटात अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तर लेखक संदीप सिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज यांनी प्रस्तुत केला आहे तर विनोद भानुशाली आणि अजय हरिनाथ सिंग यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे तर सहनिर्माते म्हणून निर्माते कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कान्स या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्याची मिळालेली संधी सिनेसृष्टीसाठी मोठी बाब आहे.

Web Title: Cannes 2022 Meera Chopra Unveils First Look Of Safed As She Makes Red Carpet Debut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top