'वहिनी अहो काय हे! ऋषभचा जरा तरी...' उर्वशीच्या ओठांचा रंगच बदलला | Urvashi Rautela Cannes 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cannes Film Festival 2023

Cannes Film Festival 2023 : 'वहिनी अहो काय हे! ऋषभचा जरा तरी...' उर्वशीच्या ओठांचा रंगच बदलला

Cannes Film Festival 2023 Urvashi Rautela trolls - उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंसाठी चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्वशीचे व्हायरल होणारे लूक्स नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असतो. उर्वशी ही आता कान्समध्ये सहभागी झाली आहे. मात्र यासगळ्या तिच्या वाट्याला कौतूकापेक्षा टीकाच जास्त आली आहे.

कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ऐश्वर्याच्या लूकचे एकीकडे कौतूक होत असताना दुसरीकडे उर्वशीच्या त्या फोटोची चर्चा आहे. तिनं लावलेल्या लिपस्टिकचा रंग पाहून चाहत्यांनी उर्वशीचं कौतूक केलंय मात्र नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील उर्वशीच्या तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे चर्चेत आली होती.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

कान्समध्ये जाऊन लोकं वेडी होतात की काय अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, आता आम्हाला कान्समधून कार्टून पाहायला मिळत आहे. आपण काय फॅशन करतो आहोत ती कशी वाटेल याचा अंदाज या सेलिब्रेटींना कसा येत नाही. असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

उर्वशीनं जी लिपस्टिक लावली आहे तशीच ती ऐश्वर्यानं देखील लावल्याचे दिसून आले होते. ऐश्वर्यानं २०१७ मध्ये अशा प्रकारची लिपस्टिक ओठांवर लावली होती. मात्र उर्वशीचा तो लूक व्हायरल झाल्यानंतर तिचं कौतूक बाजुलाच तिच्यावर टीकाच जास्त होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिला ऋषभच्या नावावरुन चिडवायला सुरुवात झाली आहे. उर्वशीनं लावलेल्या लिपस्टिकचा रंग मात्र नेटकऱ्यांना फारसा आवडलेला नाही.

उर्वशी ही कान्समध्ये मॉन्स्टर नावाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान्सच्या रेड कार्पेटवर आली होती. तिच्या त्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते आहे. उर्वशी जो काही लूक शेयर करते आहे त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीच्या तिच्या लूकची चर्चा झाली. त्यानंतर अनेकांनी तिला ऋषभच्या नावावरुन ट्रोल केले होते.

उर्वशीचा तो लूक व्हायरल झाल्यानंतर अनेक पापाराझ्झींना ती ऐश्वर्याच आहे असे वाटले होते. त्यांनी तिला ऐश्वर्या अशी हाकही मारली होती. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या गंमतीशीर होत्या.