कंगणा राणावत विरोधात ब्रोकरेजच्या पैशांवरुन पोलिसात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

प्रकाश रोहिरा खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारानेच ब्रोकरेज वाढवून 2 टक्के म्हणजे 20 लाख रुपये मागितल्याचे सांगत असा व्यवहार ठरलाच नव्हता, असा दावा कंगणाच्या टीमने केला आहे. 

मुंबई : मुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या व्यवहारावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंगल्याचं ब्रोकरेज न भरल्याचा आरोप या बहीणींवर करण्यात आला आहे. 

2017 साली कंगना आणि रंगोलीने वांद्रे येथील पाली हिल परिसरात 20.7 कोटी किंमतीचा बंगला विकत घेतला होता. सर्वसाधारणपणे मुळ किंमतीच्या 1 टक्के एवढा ब्रोकरेज दिला जातो. यावरुन 20 लाख रुपयांची रक्कम कंगनाने ब्रोकरेजसाठी दिल्याचे तिच्या टीमने स्पष्ट केलं आहे. 

पण या व्यवहारातील ब्रोकरला त्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप कंगनावर केला जात आहे. याबाबत प्रकाश रोहिरा खार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारानेच ब्रोकरेज वाढवून 2 टक्के म्हणजे 20 लाख रुपये मागितल्याचे सांगत असा व्यवहार ठरलाच नव्हता, असा दावा कंगणाच्या टीमने केला आहे. 

कंगनाने घेतलेल्या बंगल्याची जागा 3 हजार 75 चौरस फूट आहे. 20 कोटी 7 लाख रुपयांना तो विकत घेण्यात आला. तर 1 कोटी 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी कंगणाने भरली आहे. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Case Filed Against Kangna Ranavat At Mumbai

टॅग्स